शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

अल्पवयीन मुलीच्या मृत्यूने उफाळला ‘जनआक्राेश’; आरोपीस ठोकल्या बेड्या

By चैतन्य जोशी | Updated: September 3, 2022 18:09 IST

१६ वर्षीय मुलीचा मृतदेह विहिरीत संशयास्पद स्थितीत आढळून आला होता.

वर्धा : जिल्ह्यातील तळेगाव (टालाटुले) गावात अवघ्या १६ वर्षीय मुलीचा मृतदेह विहिरीत संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. या घटनेने उलटसुलट चर्चेला उधाण आल्याने गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वर्ध्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता रुग्णालयात मृतक मुलीच्या कुटुंबीयांसह संपूर्ण गावातील नागरिकांचा जनआक्राेश उफाळला होता. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मृतक मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन मारेकऱ्याविरुद्ध  ३ रोजी  हत्येचा गुन्हा दाखल करुन त्यास बेड्या ठोकल्या. 

तळेगाव टा. गावातील विहिरीत २ सप्टेंबर रोजी अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने गावात चांगलीच खळबळ माजली होती. अल्लीपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत तपास सुरु केला. मात्र, मुलीचा मृतदेह आढळुन आल्याने मृतक मुलीच्या नातलगांनी तसेच गावकऱ्यांनी पोलीस विभागाला चांगलेच धारेवर धरले. इतकेच नव्हे तर गावांत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

मुलीचा मृतदेह पोलिसांनी २ रोजी रात्रीच्या सुमारास वर्ध्यातील सामान्य रुग्णालयात उत्तरिय तपासणीसाठी पाठविला. मात्र, रात्रीपासूनच जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतक मुलीच्या नातलगांनी गर्दी केली होती. जिल्हा रुग्णालयातही तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांची कुमक पाचारण करण्यात आली होती. आरोपीवर कारवाई करीत अटक करण्याची मागणी नातलगांसह गावकऱ्यांनी रेटून धरली होती. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी गोपाल किसना फाटे (२३) याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धाArrestअटक