शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या भांडणातून वर्ध्यातील युवकाची चंद्रपुरात निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 16:19 IST

मानलेल्या बहिणीसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या युवकाचा काटा काढण्याच्या इराद्याने चंद्रपूर जिल्ह्यातील युवकाने वर्ध्यातील युवकाची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देमानलेल्या बहिणीसोबतच्या संबंधांमुळे आले वितुष्टक्रौर्याची परिसीमागळा आवळल्यानंतर दगडाने केला प्रहार नंतर मृतदेह पेटवला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: मानलेल्या बहिणीसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या युवकाचा काटा काढण्याच्या इराद्याने चंद्रपूर जिल्ह्यातील युवकाने वर्ध्यातील युवकाची निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. क्रौर्याची परिसीमा गाठलेल्या या कृत्यात सूरज रामभाऊ आत्राम (४२) रा. चंद्रपूर याने वर्ध्याच्या गुड्डू उर्फ पुरुषोत्तम बाबाराव कदम (३७ ) याची १० आॅक्टोबर रोजी हत्या केली. त्याने गुड्डूची गळा आवळून हत्या केल्यानंतर त्याच्या डोक्यावर दगडाने प्रहार केले. एवढेच नाही तर त्याचा मृतदेह नष्ट करण्यासाठी त्याने अतिज्वलनशील पदार्थ टाकून त्याचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला.या संपूण घटनाक्रमाची पार्श्वभूमी अशी की, सूरजच्या मानलेल्या बहिणीसोबत गुड्डूचे अनैतिक संबंध होते. याची कल्पना सूरजला नव्हती. काही कारणास्तव सूरज वर्ध्यात आल्यानंतर त्याला ही माहिती मिळाली. दरम्यान गुड्डूने सूरज व सदर महिलेला मारहाणही केली. या घटनेचा वचपा काढण्याची संधी सूरज शोधत होता. आॅक्टोबरच्या सुरुवातीला ही महिला चंद्रपूरला जात असल्याचे गुड्डूला कळल्याने तोही तिच्या मागे बल्लारशाहला गेला. याचवेळी सूरजने त्याला दारु पिण्याच्या निमित्ताने जंगलात नेऊन त्याचा काटा काढला.गुड्डू परत न आल्याने त्याच्या आईने तो हरवल्याची तक्रार २२ आॅक्टोबर रोजी पोलिसांत दिली. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे वळता झाल्यानंतर तपासकामाला वेग आला. पोलिसांनी सूरजला ताब्यात घेतले व बोलते केले. त्यानंतर हे भयानक हत्याप्रकरण समोर आले. चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रामनगर पोलीस ठाण्यात २२ आॅक्टोबरला दाखल मिसिंगच्या तक्रारीचा तपास आमच्याकडे वळता झाला. त्या प्रकरणी खात्रिदायक माहितीच्या आधारे चंद्रपूर गाठून अधिकची माहिती मिळविल्यावर गुड्डू उर्फ पुरुषोत्तम कदम याची हत्या झाल्याचे पुढे आले आहे. मृतक व आरोपीच्या बहिणीचे मागील दहा वर्षांपासून अनैतिक संबंध होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीचा राग मनात धरून आरोपीने गुड्डूची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. सुरज आत्राम याला अटक करण्यात आली आहे.- निलेश ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक, स्था. गु. शा. वर्धा.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी