शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सूर नदीवर पोहोचले अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 22:12 IST

सेलू तालुक्यातील सुरगावच्या सूर नदीला रेती घाटाचे स्वरूप आले होते. काही रेतीमाफियांनी येथे अड्डाच जमविल्याने नदीचे पात्र धोक्यात आले. महसूल विभाग व पोलिसांचीही रेती माफियांसोबत साठगाठ असल्याने कारवाईकडे कानाडोळा होत होता.

ठळक मुद्देरेतीचोरीला आले होते उधाण : तक्रारी, निवेदनानंतर घेतलीय दखल

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : सेलू तालुक्यातील सुरगावच्या सूर नदीला रेती घाटाचे स्वरूप आले होते. काही रेतीमाफियांनी येथे अड्डाच जमविल्याने नदीचे पात्र धोक्यात आले. महसूल विभाग व पोलिसांचीही रेती माफियांसोबत साठगाठ असल्याने कारवाईकडे कानाडोळा होत होता. अखेर तक्रारी व निवेदनाचा ओघ वाढतच गेला. त्याला लोमकतने वाचा फोडल्यानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेत पंचनामा केला.मागील वर्षभरापासून सूर नदीला रेती चोरट्यांनी लक्ष केले होते. दिवसरात्र या नदीवरुन चोरटी वाहतूक सुरु असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत लोकमतने सलग वृत्ताच्या माध्यमातून वाचा फोडली. त्यामुळे तहसीलदार महेंद्र सोनोने यांनी रेती जप्त करून ती तहसील कार्यालयात जमा केली होती; पण कुणावरही कारवाई केली नसल्याने कारवाईचा वचक राहिला नाही. त्या कारवार्ईत रेती, चाळण्या, घमेले, फावडे जप्त करण्यातच महसूल विभागाने धन्यता मानली. महसूल विभागातील अधिकाºयांचे रेती चोरट्यांसोबत मिलीभगत असल्याने ते कारवाईचा केवळ दिखावा करुन दंड ठोठावून सोडून देतात. त्यामुळे रेती माफीयाही निर्ढावले आहे. अधिकाºयांचा धाक राहिला नसल्याने या नदीपात्राला पोखरण्याचे काम सुरुच होते. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांसह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार केली. तेव्हा महसूल यंत्रणेला जाग आली. अखेर महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आता काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.नदीपात्रातील रेती केली जप्त; पण कारवाई कुणावर होणार?सूर नदीवर गुरुवारला सकाळी मंडळ अधिकारी उईके यांनी सहकाºयांसह धडक केली. तेव्हा नदीपात्रात रेतीचे ढिग आढळून आले. त्यांनी पंचनामा करीत हे रेतीचे ढिग जप्त केले. पण, आता यासंदर्भात कारवाई कोणावर होणार? याचे उत्तर देण्यासाठी अधिकारी असमर्थ ठरले आहे. त्यामुळे ही कारवाई फक्त कागदोपत्रीच तर राहणार नाही ना? असा प्रश्नही उपस्थित केल्या जात आहे.मोझरी परिसरातून रेतीची अवैध वाहतूकमोझरी (शेकापूर) परिसरातील नाल्यांवरून पावसाळा संपला तोच नदीचे पाणी कमी झाल्याबरोबर वाळूमाफीयांचा नजरा रेतीवर पडल्या. गेल्या काही दिवसांपासून येथून ३ कि़मी. अंतरावर असलेल्या वर्धा नदी घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरटी वाहतुक सुरू आहे. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी शासनाला लाखोंचा मिळणारा महसूल हे रेतीचोर लांबवत आहे. सध्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. पावसाळ्यात रेतीघाट बंद असल्यामुळे तसेच नवीन रेतीघाटांचा लिलाव झाला नसल्याने चढ्या भावाने रेती विकत असल्याचे दिसते. मोझरी परिसरातील झगळी शिवारातून पांदन रस्त्याने तसेच काही शेतकºयांच्या शेतातून ट्रॅक्टरद्वारे चोरटी वाहतूक सुरू आहे. या चोरट्या वाहतूकीला प्रतिबंध घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :riverनदीsandवाळू