शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अखेर आमदारांच्या उपोषण मंडपात पोहोचले अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 05:00 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु, यावर काेणताही तोडगा निघाला नसल्याने आमदार कुणावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूलाच १५ फेब्रुवारीपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणात भाजपचे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश असून, तीन दिवसापर्यंत एकाही अधिकाऱ्याने उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकरिता आमदार समीर कुणावार यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य आणि सरपंच गेल्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला साखळी उपोषणाला बसले आहेत. परंतु, एकाही अधिकाऱ्याने या उपोषणाची दखल घेतली नसल्याने ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच शुक्रवारी अधिकाऱ्यांचे पाय उपोषण मंडपाकडे वळले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई आणि कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करणे थांबवावे, याकरिता आमदार कुणावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु, यावर काेणताही तोडगा निघाला नसल्याने आमदार कुणावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूलाच १५ फेब्रुवारीपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणात भाजपचे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश असून, तीन दिवसापर्यंत एकाही अधिकाऱ्याने उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही. खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर व दादाराव केचे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सरिता गाखरे, सभापती मृणाल माटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. खुद्द आमदार उपोषणाला बसल्यावरही अधिकारी खुर्च्या राखत असल्याने रोष व्यक्त होत होता. शुक्रवारी ‘लोकमत’ने याविषयीचे वृत्त प्रकाशित करताच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने अधीक्षक लोखंडे, महावितरणचे अधीक्षक अभियंता सावंत आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी इंगळे यांनी उपोषण मंडपात जाऊन मागण्या जाणून घेत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतु, जोपर्यंत लेखी आश्वासन मिळणार नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. उलट हे उपोषण आणखी व्यापक होणार,  असा इशारा आ.कुणावार यांनी अधिकाऱ्यांना दिला. यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष तथा गटनेता नितीन मडावी, सभापती माधव चंदनखेडे, कामगार नेता मिलिंद देशपांडे यांच्यासह उपोषणकर्ते उपस्थित होते.

तुम्ही अधिकारी, राजकारण करु नका! -  अखेर ‘लोकमत’च्या दणक्यानंतर अधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन आ. कुणावार यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. परंतु, गेल्या तीन दिवसापासून एकाही अधिकाऱ्यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांची बाजू जाणून घेतली नाही. त्यामुळे आमदारांनी या अधिकाऱ्यांना ‘साहेब... तुम्ही अधिकारी आहेत, शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी येथे उपोषण सुरु आहे. त्यामुळे त्याची दखल घेऊन समस्या सोडविणे अपेक्षित आहे. कोण्या नेत्याच्या दबावात येऊन राजकारण करु नका!’, असा सज्जड इशारा दिला.

 सर्व आमदार मिळून आवाज उठवणार : चंद्रशेखर बावनकुळे-    माजी ऊर्जा मंत्री तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या उपोषणस्थळी उपस्थित राहून आमदार कुणावार यांच्याशी चर्चा केली. तसेच मागील सरकारच्या काळात तिन्ही कंपन्या नफ्यात होत्या. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांमुळे कंपन्या तोट्यात येत आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी कापणे बंद करा, पथदिवे सुुरू करा,  सर्वसामान्य व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मोगलशाही करु नका. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात सर्व आमदार मिळून ३ तारखेला पायऱ्यावर बसून आंदोलन करु. गरज पडल्यास आझाद मैदानावर मोर्चा काढू असा इशारा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन करताना दिला.

 

टॅग्स :agitationआंदोलनMLAआमदार