शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वर्ध्यात इंजेक्शनच्या बाधेने नर्सिंगची विद्यार्थिनी दगावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 07:07 IST

सावंगी (मेघे) येथील श्रीमती राधिकाबाई मेघे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींना ‘हेपिटायटीस बी’चे (कावीळ) इंजेक्शन दिल्याने त्याची बाधा (रिअ‍ॅक्शन) झाली. एका विद्यार्थिनीचा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी पहाटे मृत्यू झाला.

वर्धा : सावंगी (मेघे) येथील श्रीमती राधिकाबाई मेघे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींना ‘हेपिटायटीस बी’चे (कावीळ) इंजेक्शन दिल्याने त्याची बाधा (रिअ‍ॅक्शन) झाली. एका विद्यार्थिनीचा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी पहाटे मृत्यू झाला. उपचारानंतर ९ विद्यार्थिनींना सोडण्यात आले.रुग्णालयात विद्यार्थ्यांसह नातेवाईकांनी गर्दी केली होती. शुक्रवारी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींना ‘हेपिटायटीस बी’चे इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर दहा विद्यार्थिनींना रिअ‍ॅक्शन आली. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. बीएस सी. च्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या हिमानी रवींद्र मलोंडे (१९, रा. देवळी,) हिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. शुक्रवारपासून नातेवाईकांसह विद्यार्थ्यांनी रुग्णालय परिसरात ठिय्या मांडला होता.इंजेक्शनमध्ये सापडल्या अळ्यासोलापूरच्या सहकारी रुग्णालयातील भांडारातून घेतलेल्या इंजेक्शनमध्ये अळ्या आढळून आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासन आणि रुग्णालय प्रशासनानेही भांडारातील औषधांची तपासणी केली़पृथ्वीराज चव्हाण (२ वर्षे) यास तीन दिवसांपूर्वी ताप, सर्दी, खोकला असल्याने रुग्णालयात दाखल केले. शनिवारी सकाळी डॉक्टरांनी लिहून दिलेले दोन इंजेक्शन आणले. दुसरे इंजेक्शन देत असताना नातेवाईकांना त्यात अळ्या दिसल्या. नर्स व डॉक्टरांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यामुळे नातेवाईकांनी थेट जेलरोड पोलीस ठाणे गाठले. मुलाचे काका शंकरराव यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.हिमानीची प्रकृती बिघडल्याची माहिती तिच्या मैत्रिणींंकडून मिळाली. औषधामध्ये दोष असू शकतो. प्रकरणाची सखोल चौकशी करुन न्याय द्यावा, अशी मागणी हिमानीचे वडील रवींद्र मलोंडे यांनी केली.रुग्णालयात काम करणाºया डॉक्टर, नर्सेसना संक्रमण होऊ नये म्हणून ‘हेपिटायटीस बी’चे इंजेक्शन दिले जाते. लाखात एखाद्या व्यक्तीबाबत, अशी घटना घडते. त्याबाबच रुग्णालयाची प्रशासकीय समिती चौकशी करत आहे. सर्व प्रकारच्या चौकशीला सहकार्य करू.- अभ्युदय मेघे, प्रशासकीय अधिकारी, आचार्य विनोबा भावे रुग्णालय, सावंगी 

टॅग्स :Deathमृत्यू