शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

आता फ्लॅटमध्येही पेटवायच्या का चुली; गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी महागले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 05:00 IST

कोरोनाकाळात अनेकांना आर्थिक फटका बसला असून ओढाताण करून गाडा रुळावर आणण्याचा प्रत्येकाकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र, महागाई पाठ सोडत नसल्याने सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहे. रोजच्या जीवनामध्ये अत्यावश्यक असलेले गॅस सिलिंडरही दरमहा २५ रुपयांनी वाढत असल्याने महिन्याचे बजेट बिघडत आहे. जानेवारी महिन्यापासून १९० रुपयांची दरवाढ झाली असून या महिन्यात ग्राहकांना ९३६.५० रुपयांमध्ये सिलिंडर विकत घ्यावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहरी भागासोबतच आता ग्रामीण भागामध्येही गॅस सिलिंडरचा वापर वाढला आहे. ग्रामीण भागात सिलिंडरचा भडका उडाल्यामुळे चुली पेटायला लागल्य, पण आता या दरवाढीची झळ शहरातही जाणवू लागल्याने घर व फ्लॅटमध्येही चुली पेटवायच्या का? असा संतप्त सवाल गृहिणींकडून विचारल्या जात आहे.कोरोनाकाळात अनेकांना आर्थिक फटका बसला असून ओढाताण करून गाडा रुळावर आणण्याचा प्रत्येकाकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र, महागाई पाठ सोडत नसल्याने सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहे. रोजच्या जीवनामध्ये अत्यावश्यक असलेले गॅस सिलिंडरही दरमहा २५ रुपयांनी वाढत असल्याने महिन्याचे बजेट बिघडत आहे. जानेवारी महिन्यापासून १९० रुपयांची दरवाढ झाली असून या महिन्यात ग्राहकांना ९३६.५० रुपयांमध्ये सिलिंडर विकत घ्यावे लागत आहे. दरमहा सिलिंडरची भाववाढ नवा उच्चांक गाठत असून ही दरवाढ अशीच कायम राहिली तर शहरातील घरांमध्येही चुली पेटविल्याशिवाय पर्याय राहणार नाही.

सबसिडी किती मिळते हो भाऊ!

- घराघरामध्ये आता सिलिंडचा वापर वाढला असून या वर्षात तब्बल १९० रुपयांची दरवाढ झाली आहे. दर महिन्याला २५ रुपयांची दरवाढ होत आहे. मात्र, सिलिंडरवर मिळणारी सबसिडी दिवसेंदिवस कमी होत आहे.- यावर्षी जानेवारी महिन्यांपासून ग्राहकांना केवळ ४० रुपये इतकी नाममात्र सबसिडी मिळत आहे. बऱ्याच ग्राहकांच्या खात्यात नियमित जमाही होत नसल्याची ओरड आहे.

व्यावसायिक सिलिंडरही महागले- घरगुती सिलिंडरसोबतच १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरचीही मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे याही सिलिंडरच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस वाढत होत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये १ हजार ७५९.५० रुपयांत मिळणारे सिलिंडर आता १ सप्टेंबरपासून १ हजार ८३४.५० रुपये झाले आहेत. घरगुती सिलिंडरमध्ये २५ रुपयांची वाढ झाली असताना व्यावसायिक सिलिंडरमध्ये ७५ रुपयांची वाढ झाली आहे.

महिन्यांचे गणितच कोलमडले

घराघरांमध्ये गॅस सिलिंडरचा वापर वाढला आहे. आता शहरामध्ये चुली पेटवायला जागाही शिल्लक राहिली नाही. त्यामुळे सिलिंडरशिवाय पर्यायच नाही. अशातच कोरोनाकाळात महागाईचा भडका उडाला. सिलिंडरचे दरही दर महिन्याला वाढतच आहे. त्यामुळे महिन्याचे गणितच बिघडले आहे.माधुरी देशमुख, वर्धा.

कोरोनाच्या महामारीमुळे महिन्याची मिळकतही कमी झाली आहे. अशा दिवसात महागाईचा भडका उडाल्याने घरखर्च करताना मोठी अडचण होत आहे. सिलिंडरचे दरही दर महिन्याला वाढत असल्याने सिलिंडर घेण्यासाठी आधीच तडजोड करावी लागत आहे.पूजा ढोके, वर्धा.

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर