शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आता वर्ध्यातील विद्युत वाहिनीही होणार भूमिगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 23:50 IST

वीजखांब, वाहिन्यांमुळे अपघात होतात. विद्युत चोरी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे महावितरणला नेहमीच जीव आणि वित्तहानीला सामोरे लावे लागते. हे टाळण्याच्या दिशेने महावितरणचे पाऊल पुढे पडत असून आगामी काळात शहरातील विद्युत वाहिनीदेखील भूमिगत अंथरली जाणार आहे. महावितरणतर्फे तसा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

ठळक मुद्दे१८५ कोटींचा प्रस्ताव। अपघात टळतील आणि महावितरणचे नुकसानही

सुहास घनोकार ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वीजखांब, वाहिन्यांमुळे अपघात होतात. विद्युत चोरी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे महावितरणला नेहमीच जीव आणि वित्तहानीला सामोरे लावे लागते. हे टाळण्याच्या दिशेने महावितरणचे पाऊल पुढे पडत असून आगामी काळात शहरातील विद्युत वाहिनीदेखील भूमिगत अंथरली जाणार आहे. महावितरणतर्फे तसा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.वादळवारा, पाऊस आणि विजेच्या कडकडाटामुळे महावितरण कंपनीला सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याचे वास्तव आहे. याशिवाय विद्युत चोरीचे प्रकारदेखील सुरूच असतात. विविध प्रकारच्या अपघातांमध्ये वीज वितरणचेच नुकसान होते. याशिवाय कधी-कधी निर्माण होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे शहर काळोखात बुडते. या घटनांची मागील काही वर्षांत प्रमाण वाढल्याने महावितरण कंपनीने तब्बल १८५ कोटींचा प्रस्ताव ११ फेब्रुवारीला मुख्य अभियंता, महावितरण यांच्याकडे पाठविला आहे. तेथून हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीकरिता महावितरणच्या प्रादेशिक संचालकांकडे पाठविण्यात आला आहे.महावितरणच्या मुंबईतील मुख्यालयाने प्रस्तावातील त्रुटी दूर करीत मंजुरी दिल्यानंतर ऊर्जा मंत्रालयाकडे तो निधी उपलब्धतेसाठी पाठविला जाणार आहे. शहर ओव्हरहेड वीजवाहिनीमुक्त करण्याकरिता तब्बल १६२ किलोमीटर दुहेरी उच्चदाब तर ५७६ किलोमीटर लघुदाब विद्युत वाहिनीचे जाळे अत्याधुनिक यंत्रांच्या सहाय्याने टाकले जाणार आहे. याशिवाय सर्कल पद्धतीचे रिंग मेन युनिट कार्यान्वित करण्यात येणार असून एका ठिकाणी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास या सर्कलमधील पर्यायी व्यवस्थेतून तो पूर्ववत सुरू करता येणार असल्याने ग्राहकांना २४ तास विद्युत पुरवठा उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे. या प्रस्तावावर ऊर्जा मंत्रालयाकडून शिक्कामोर्तब झाल्यास शहर खऱ्या अर्थाने स्मार्ट होईल, असे बोलले जात आहे.सिव्हिल लाईनपासून काम प्रगतिपथावरशहरातील सिव्हिल लाईनपासून भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी हे काम मंजूर करून घेतले. राष्टÑपिता महात्मा गांधी पुतळ्यापासून बजाज चौकापर्यंत अंदाजे अडीच ते तीन किलोमीटर उच्चदाब विद्युत वाहिनी भूमिगत टाकली जात आहे.

टॅग्स :electricityवीज