शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संवर्धनासाठी समग्र शिक्षण अंतर्गत शाळांमध्ये आता 'इको क्लब' ची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 17:36 IST

Vardha : अक्षरे गिरवण्याबरोबर विद्यार्थी लावणार निसर्गालाही जीव संगोपनाची जबाबदारी खांद्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती व्हावी, विद्यार्थ्यांना पर्यावरणाबाबत असलेल्या जबाबदारीची जाणीव व्हावी, म्हणून सर्व शाळांमध्ये इको क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमात शालेय विद्यार्थी अक्षरे गिरवण्याबरोबर निसर्गालाही जीव लावणार आहेत. पर्यावरणाच्या धड्याबरोबर शाळेत रोपटी लावून त्यांचे संगोपनही करणार आहेत. वृक्षारोपण केलेल्या झाडांना विद्यार्थ्यांची व वर्गाची नावे दिली जाणार आहेत.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नवोपक्रमशील नागरिक तयार करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये आणि क्षमता विकसित करण्यात येणार आहेत. या धोरणानुसार समग्र शिक्षण अंतर्गत शाळेतील इको क्लबची स्थापना करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता विकसित करणे, पर्यावरणाच्या समस्या जाणून घेणे, पर्यावरण संरक्षणासाठी उपक्रमांचा समावेश करणे, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूक असावे यासाठी प्रत्येक शाळेत इको क्लब स्थापन होणार आहे. फक्त क्लब स्थापन करून थांबायचे नाही. तर पर्यावरण विषयक जागृती, ई वेस्ट, प्लास्टिक यांचे होणारे परिणाम आणि दुष्परिणाम याचीही माहिती विद्यार्थ्यांना देणार आहे. इको क्लब अंतर्गत शाळांमध्ये पहिली ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण करायची आहे. त्यासाठी एका आठवड्याचे शिबिरही आयोजित करणार आहे. शिबिराच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे, शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारणे, ई- कचरा कमी करणे, कचरा कमी करणे, ऊर्जा व पाणी बचत आणि प्लास्टिकचा वापर टाळणे या सात संकल्पनांवर आधारित उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. 

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ई कचरा कमी करण्यासाठी शाळांमध्ये कचरा संकलन केंद्र तयार करणे, ई कचऱ्याचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाविषयी माहिती दिली जाणार आहे.

मुख्याध्यापक राहणार इको क्लबचे प्रमुख शाळेत स्थापन केलेल्या इको क्लबचे प्रमुख मुख्याध्यापक राहणार असून प्रत्येक शाळेत दोन शिक्षक व एक वर्ग प्रभारी उपक्रम राबविण्यास मदत करणार आहेत. विद्यार्थी, शिक्षक आणि समन्वयक प्रत्येक वर्गातील मुलांचे पालक इको क्लबचे सदस्य राहणार आहेत. विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या सहभागास प्रोत्साहित करतील. इको क्लब उपक्रमांतर्गत वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात येत आहेत. 

"नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक शाळांमध्ये इको क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थी शाळांमधील शिक्षकांसह विद्यार्थीही मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. या उपक्रमामुळे पर्यावरण मित्रत्व आणि पर्यावरण संवर्धनाची संस्कृती रुजण्यास मदत होणार आहे."- डॉ. नीतू गावंडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

टॅग्स :wardha-acवर्धा