शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आता वर्धेकरांसाठी मुबलक पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:53 IST

येथील नगर परिषद हद्दीतील रहिवाशांची तहाण भागविण्यासाठी न. प. प्रशासनाला पाटबंधारे विभागाकडून पाणी विकत घेवून त्याचा पुरवठा नागरिकांना करावा लागतो.

ठळक मुद्देनगरसेवकांची बहुमताने हिरवी झेंडी : पूर्वी होते ५.७९ द.ल.घ.मी. पाणी राखीव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील नगर परिषद हद्दीतील रहिवाशांची तहाण भागविण्यासाठी न. प. प्रशासनाला पाटबंधारे विभागाकडून पाणी विकत घेवून त्याचा पुरवठा नागरिकांना करावा लागतो. पूर्वी वर्धेकरांसाठी ५.७९ द.ल.घ.मी. पाणी राखीब ठेवल्या जायचे; पण तेही पाणी वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने अपूरे पडत असल्याने नुकत्याच पार पडलेल्या न.प.च्या सर्वसाधारण सभेत ७.५ द.ल.घ.मी. पाणी राखीव ठेवण्याच्या विषयाला सर्व नगरसेवकांनी संमती दर्शविली आहे. त्यामुळे आता वर्धेकरांना मुबलक पाणी मिळणार आहे.वर्धा शहरातील नागरिकांना नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा केल्या जातो. नागरिकांना पुरवठा करण्यात येणारे पाणी वर्धा न. प. प्रशासन पाटबंधारे विभागाकडून खरेदी करते. पवनार व येळाकेळे येथील धाम नदी पात्रातून या पाण्याची उचल केल्यानंतर शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण करीत तो जलसाठा ठिकठिकाणी असलेल्या जलकुंभात साठवून त्याचा पुरवठा नागरिकांना केल्या जातो. न. प. प्रशासनाने सुमारे १४ हजार कुटुंबियांना नळ जोडणी दिली आहे. त्यांच्याकडून न. प. प्रशासन पाणी पट्टी कर वसूल करते. पूर्वी पाटबंधारे विभागाकडून ५.७९ द.ल.घ.मी. पाणी राखीव ठेवून न.प. प्रशासनाकडून त्यापेक्षा जादा पाण्याची उचल करण्यात आल्याने न. प. ला पेनॉल्टी लागत होती; पण आता वाढती लोकसंख्या व वाढलेली पाण्याची मागणी लक्षात घेता ७.५ द.ल.घ.मी. पाणी राखीव ठेवण्याच्या विषयाला सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी बहूमताने संमती दर्शविली आहे. त्यामुळे आता न.प.ला पेनॉल्टी सारख्या प्रकाराला सामोरे जावे लागणार नसून नागरिकांनाही मुबलक पाणी मिळणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.१४ हजार कुटुंबीयांना नळ जोडणीअमृत योजनेच्या माध्यमातून वर्धा शहरात नवीन जलवाहिनी टाकणे व जलकुंभ आदी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वर्धा न. प. प्रशासनाने आतापर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रातील सुमारे १४ हजार कुटुंबियांना नळ जोडणी दिली आहे. दिवसेंदिवस नळ जोडणी बाबातचे नागरिकांचे आवेदन न. प. कडे प्राप्त होत असून मागेल त्याला नळ जोडणी देण्यात येत आहे.प्रती हजार लिटरप्रमाणे मोजावे लागते पैसेधाम नदीच्या येळाकेळी व पवनार येथील पात्रातून उचल करण्यात येणाºया पाण्याचे प्रती हजार लिटर प्रमाणे पैसे न.प. प्रशासनाला मोजावे लागतात. न.प. प्रशासन प्रत्येक महिन्याला त्याचे देयक पाटबंधारे विभागाला अदाही करते. खरीपात २.९३ रुपये, रबी हंगामात ५.८५ रुपये तर उन्हाळी हंगामात ८.७८ रुपये प्रती हजार लिटर मागे न.प. प्रशासनाला मोजावे लागते. तर न.प. प्रशासन नळ जोडणी दिलेल्या नागरिकाकडून वर्षाला पाणी पट्टी कर म्हणून १ हजार ५०० रुपयांचे देयक देत त्याची वसूली करते. न.प. प्रशासन व पाटबंधारे विभाग यांच्या एक करार करण्यात आला आहे. हा करार सहा वर्षांसाठी करण्यात आला असून प्रत्येक वर्षी एक वेगळा करारही करण्यात येतो.पाणी आरक्षणाचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाउन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या मागणीत वाढ होत असल्याने आरक्षीत केलेल्या पाण्यापेक्षा जादाचीच उचल न.प. प्रशासनाकडून होत होती. परिणामी, न.प. प्रशासनाला पेनॉल्टीही लागत होती. परंतु, आता पाण्याच्या आरक्षणात वाढ करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर कुठल्या शहरासाठी किती पाणी आरक्षीत ठेवावे याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असल्याचे न. प. अधिकाऱ्यांनी सांगितले.लिकेज दुरूस्तीमुळे पाण्याच्या अपव्ययाला ब्रेकशहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी येळाकेळी ते वर्धा व पवनार ते वर्धा या मुख्य जलवाहिनींसह शहरात जलवाहिनीचे मोठे जाळेच टाकण्यात आले आहे. परंतु, जलवाहिनी वेळोवेळी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत होता. सध्या स्थितीत पवनार ते वर्धा व येळाकेळी ते वर्धा या मुख्य जलवाहिनीसह ठिकठिकाणचे जलवाहिनीचे लिकेजस दुरूस्त करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वी होत असलेल्या पाण्याच्या अपव्ययाला ब्रेक लागल्याचे न. प. पाणी पुरवठा विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

टॅग्स :Waterपाणी