शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

आता 38 केंद्रांवरून 30 प्लस नागरिकांना मिळणार लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 5:00 AM

लस तुटवड्यामुळे जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देणे बंद हेाते. तर आता ३० पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक लसीकरण केंद्रावर सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ४५ पेक्षा जास्त वयोगटातील जास्तीत जास्त १०० व्यक्तींना तर दुपारी १.३० ते ५ या वेळेत ३० पेक्षा जास्त वयोगटातील जास्तीत जास्त १५० व्यक्तींना प्रत्येक दिवशी लस दिली जाणार आहे.

ठळक मुद्देकेंद्रांवर केली व्यवस्था : नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी होणार प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र शासनाने १८ पेक्षा जास्त वयोगटातील प्रत्येक व्यक्तीला कोविडची लस देण्याचे निश्चित केले असले तरी राज्य शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून रविवारपासून जिल्ह्यातील तब्बल ३८ केंद्रांवरून ३० पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना केाविड व्हॅक्सिन दिली जाणार आहे. त्यासाठीची संपूर्ण तयारी आरोग्य विभागाने केली आहे.लस तुटवड्यामुळे जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देणे बंद हेाते. तर आता ३० पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक लसीकरण केंद्रावर सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ४५ पेक्षा जास्त वयोगटातील जास्तीत जास्त १०० व्यक्तींना तर दुपारी १.३० ते ५ या वेळेत ३० पेक्षा जास्त वयोगटातील जास्तीत जास्त १५० व्यक्तींना प्रत्येक दिवशी लस दिली जाणार आहे. लसीकरण मोहिमेला गती देताना कुठल्याही केंद्रावर नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेतली जाणार आहे.

केंद्रावर ऑनलाईन तसेच स्पॅाट नोंदणीची राहणार सुविधारविवारपासून जिल्ह्यात ३० पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना कोविडची लस दिली जाणार आहे. ही लस घेऊ इच्छिणाऱ्याला ऑनलाईन पद्धतीने तसेच स्पॉट नोंदणी करता येणार आहे. प्रत्येक केंद्रावर जास्तीत जास्त १५० लाभार्थ्यांना लस दिली जाणार असून यात ऑनलाईन नोंदणी करून येणाऱ्या ७५ व्यक्तींचा समावेश राहणार आहे.

मोहिमेने ओलांडला ३.१८ लाखांचा टप्पा-१६ जानेवारीपासून जिल्ह्यात महालसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. आतापर्यंत लसीचे तब्बल ३ लाख १८ हजार ४८६ डोस लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत. यात लसीचा पहिला डोस घेणाऱ्या २ लाख ५४ हजार १०४ तर व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेणाऱ्या ६४ हजार ३८२ लाभार्थ्यांचा समावेश असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात लसीचे ३६,४९० डोस- शासनाकडून नेहमीच कमी लससाठा पाठवून लस कोंडी केल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यात सध्या कोविड प्रतिबंधात्मक लसीचे ३६ हजार ४९० डोस आहेत. आणखी काही लससाठा शासनाकडून वेळीच मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

रविवार २० रोजीपासून जिल्ह्यातील ३८ केंद्रांवरून नियोजित वेळी ३० पेक्षा जास्त वयोगटातील लाभार्थ्यांना कोविडची प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. कोरोना मृत्यू रोखण्यासाठी लस उपयुक्त असून नागरिकांनी नजीकच्या केंद्रावर जाऊन लस घ्यावी.- डॉ. प्रभाकर नाईक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या