शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

बैलांचा नव्हे, भरला चक्क ट्रॅक्टरचा पोळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:36 IST

विनोद घोडे । लोकमत न्यूज नेटवर्क चिकणी (जामणी) : वर्धा तालुक्यातील पढेगाव येथे शुक्रवारी बैल पोळा भरला. तर शनिवारी ...

ठळक मुद्देपेटविला मखर । जेसीबी मशीनही केल्या होत्या सहभागी

विनोद घोडे ।लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : वर्धा तालुक्यातील पढेगाव येथे शुक्रवारी बैल पोळा भरला. तर शनिवारी नंदी पोळ्याच्या दिवशी जिल्ह्यात नव्हे असा पहिल्यांदाच ट्रॅक्टरचा पोळा भरविण्यात आला होता. सदर पोळा बघण्याकरिता गावातील नागरिकांसह परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.कृषी आणि श्रम संस्कृतीचे महत्त्व सांगणारा बैल पोळा सर्वत्र साजरा होत असताना येथेही तो उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच आज नंदी पोळ्याच्या दिवशी दुपारी १२ वाजता बाजार चौकात सरपंच अनंता हटवार व उपसरपंच गोपाल दुधाने यांच्यावतीने ट्रॅक्टर पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पोळ्यामध्ये जेसीबीसह २५ ते ३० ट्रॅक्टर सहभागी झाले होते. एका ट्रॅक्टरवर मखर पेटवून पोळ्याची सांगता करण्यात आली.तत्पूर्वी छोट्या मुलाच्या हाताने पाच बक्षीसांठी ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. या मध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस ट्रॅक्टरची फोल्डर किट ट्रॅक्टर कंपनी कडून विलास कठाणे या भाग्यशाली ट्रॅक्टर मालकाला देण्यात आले. तर दुसरे भाग्यशाली प्रवीण रेवतकर हे ठरले. तृतीय क्रमांक किशोर वैद्य, चतुर्थ सारंग नासरे तर पाचवे बक्षीस विनोद सातपुते यांना देण्यात आले. जेसीबीसह इतर ट्रॅक्टर चालक-मालकांना शाल व श्रीफळ देवून सन्मानीत करण्यात आले. सजविलेल्या ट्रॅक्टरची ढोल ताशाच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. बदलत्या काळानुसार आपल्या परंपरा ही बदलत आहेत. मात्र अलीकडे यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या घटू लागली आहे.बैला एैवजी शेतशिवारात ट्रॅक्टर दिसून येते. हल्ली पोळ्याच्या तोरणाखाली बैलांची गर्दी खूपच कमी झाली आहे. यामुळे ट्रॅक्टरचे शेतीविषयी खूप महत्त्व वाढले आहे. शेतीकामात अविभाज्य घटक असलेल्या ट्रॅक्टरला सजवून तान्हा पोळ्याला पढेगाव येथे ट्रॅक्टरचा पोळा भरविण्यात आला. असे असले तरी परिसरातील अनेक शेतकरी आपल्या लाडक्या सर्जा-राजाच्या मदतीनेच शेती करतात. त्यांची कृतज्ञता बैलपोळ्याच्या दिवशी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाला सरंपंच अनंता हटवार, उपसरपंच गोपाल दुधाने, तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तसेच परिसरातील नागरिकांनी सहकार्य केले.बक्षीस देऊन सन्मानया पोळ्यात वैविध्यपूर्ण असलेल्या ट्रॅक्टरमालकांना मान्यवरांच्या हस्ते समारोप कार्यक्रमात बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. 

टॅग्स :Farmerशेतकरी