शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

मुलगी नको आणि रोपेही नको; कन्या वन समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जच केले नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 17:24 IST

Wardha : तीन वर्षांत जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीकडून वनीकरणकडे अर्ज नाहीच

सटवाजी वानोळे लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वनाच्छादित करून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी सरकारने विविध योजना राबविल्या आहेत. त्यात वर्ष २०१८ मध्ये ज्या कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येईल, अशा शेतकरी दाम्पत्याला १० रोपे विनामूल्य देण्यासाठी कन्या वन समृद्धी योजना सुरू केली. परंतु, गेल्या तीन वर्षांत ग्रामपंचायतीच्या मध्यामातून एकाही शेतकऱ्याने अर्ज केलेला नाही. शेतकऱ्यांनी कन्या वन समृद्धीकडे अक्षरशः पाठ फिरवलेली दिसत आहे.

दिवसेंदिवस पर्यावरणात बदल होत आहे. त्यावर प्रभावी उपाययोजना म्हणून मोठ्या प्रमाणात वृक्ष लावगड केली जात आहे. तसेच, वन विभागाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. योजनेची अनेक नागरिकांना माहितीच नसते. त्यामुळे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने यावर उपाययोजना करून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.

कोण घेऊ शकतो लाभ ?ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये जास्तीत जास्त २ मुली जन्माला येतील व त्यानंतर कुटुंबातील अपत्यांची संख्या नियंत्रित केली जाईल. तसेच, १ मुलगा किंवा १ मुलगी अथवा दोन्ही मुली ज्या कुटुंबात दोन्ही मुली ज्या कुटुंबात असतील, त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल. या योजनेसाठी ग्रामपंचायतमध्ये मुलीच्या नावाची नोंद करून ग्रामपंचायतकडे अर्ज करणे आवश्यक आहे.

महिला सबलीकरणावर सर्वांचेच लागलेय लक्षया योजनेच्या माध्यमातून मुलगा आणि मुलगी समान असून, महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण यासाठी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. तसेच, मुर्लीच्या घटत्या संख्येवर अशा योजनेच्या माध्यमातून काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणे आहे. आज घडीला महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहत असल्याने त्यांच्यासाठी देखील ही योजना आता दिलासा दायक ठरत चालली आहेत. 

लागवडीनंतर फोटो पाठवणे बंधनकारक...एकंदरित दहा झाडांची लागवड पूर्ण झाल्यानंतर लागवड केलेल्या ठिकाणाचा तपशील, रोपाचे फोटो तसेच संबंधित शेतकऱ्यांमार्फत ग्रामपंचायतीला सादर करणे बंधनकारक आहे. तसेच ही माहिती ग्रामपंचायतीमार्फत एकत्रित करुन तालुकास्तरावरील वनक्षेत्रपाल, सामाजिक वनिकरण यांना दरवर्षाला ३१ जुलै रोजीपर्यंत पाठविण्याचे नियमात सांगितल्या गेले असल्याची माहिती आहे.

मुलीच्या भविष्यासाठी वापरण्यास मुभालावगड केलेल्या झाडांची निगा, संरक्षण, संगोपन, आणि झाडे जिवंत राहण्याचे प्रमाण उच्च राहावे, याकरिता शेतकऱ्यांना तांत्रिक सल्ला सामजिक वनीकरणाकडून दिला जाईल. तसेच, लावगड केलेल्या झाडांपासून मिळणोर सर्व उत्पन्न मुलीचा कौशल विकास, उच्च शिक्षण आणि रोजगार मिळवणे व मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या ऐच्छिकतेनुसार वापरण्यास मुभा राहील.

१० रोपे सामाजिक वनीकरणच्या रोपवाटिकेतून मिळतातरोपवटामधून ग्रामपंचायतमार्फत ५ सागवान रोपे, २ आंब्यांचे रोपे, १ फणस, १ जांभूळ, अणि १ चिंच अशी रोपे दिली जातात. भौगोलिक परिस्थितीनुसार अन्य प्रकारच्या रोपांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

"गत तीन वर्षांत एकाही ग्राम पंचायतीने सामाजिक वनीकरण विभागाकडे रोपासाठी अर्ज केलेला नाही."- सुहास बडेकर, विभागीय फॉरेस्ट ऑफिसर, सामाजिक वनीकरण विभाग वर्धा

टॅग्स :gondiya-acगोंदिया