शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 Suspended : IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग पाहून BCCI चा मोठा निर्णय
2
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले
3
“भारताला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार, पाकने व्हिक्टिम कार्ड खेळू नये”; अमेरिकेने सुनावले
4
Operation Sindoor Live Updates: IPL सामने रद्द होण्याची शक्यता, BCCI घेणार निर्णय
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का! BSF ने जैशच्या ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला; सांबामधून घुसखोरीच्या प्रयत्नात होते
6
'ऑपरेशन सिंदूर'वरील प्रत्येक अपडेट देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बहिणीचं आहे बॉलिवूड कनेक्शन, जाणून घ्या याबद्दल
7
“१५ मिनिटे सत्ता द्या, पाकिस्तानला कसे नेस्तनाबूत करायचे ते दाखवून देऊ”; AIMIM नेते आक्रमक
8
पाकिस्तानची फजिती! अर्थ व्यवहार मंत्रालयाचे अकाऊंट हॅक; 'त्या' पोस्टने वेधून घेतलं जगाचं लक्ष
9
पहलगाम हल्ल्यानंतर या दिग्गज कंपनीचे ₹१९००० कोटी बुडाले, चालवते देशातील नंबर १ कंपनी
10
"देशात परिस्थिती काय अन् हा बावळट...", किंग कोहलीच्या भावाने राहुल वैद्यला सुनावलं
11
हाय अलर्ट! चंदीगड-अंबालामध्ये पुन्हा वाजले सायरन, नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना
12
'कराची बेकरी' पाकिस्तानी ब्रँड आहे का? कोणी केली सुरुवात? का दिलं असं नाव? हा इतिहास माहितीच हवा
13
आधारमधील तुमचा मोबाईल नंबर ऑनलाइन कसा बदलायचा? घरबसल्या २ मिनिटांत होईल काम
14
India-Pakistan War: सैन्य कारवाईवेळी घराचं नुकसान झाल्यास केंद्र सरकार किती पैसे देते?
15
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
16
२३ वर्षांनी अमेरिकन पत्रकाराला मिळाला न्याय; भारतानं पाकिस्तानवर हल्ला करत घेतला बदला
17
सीमेपासून समुद्रापर्यंत... भारताचे नियोजन पाहून पाकिस्तानला भरली धडकी!
18
"शत्रूला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली...", मधुगंधा कुलकर्णीची देशभक्तीवरील पोस्ट चर्चेत
19
"माझी गरज लागली तर मी बॉर्डरवर जाऊन युद्ध लढण्यासाठी तयार", प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
20
Video: ब्लॅकआऊट वेळी लाईट बंद न करणाऱ्या दुकानदारावर भडकले आजोबा; टाळक्यात हाणली काठी

मतदारसंघात ना भूमिपूजन ना पायाभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 23:54 IST

जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार क्षेत्रातील एकूण ५१९ ग्रामपंचायतीपैकी २९८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने संपूर्ण जिल्ह्यातच आचारसंहिता लागली आहे. संपूर्ण जिल्ह्याला आचारसंहिता असलेला वर्धा जिल्हा हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे.

ठळक मुद्देआचारसंहितेमुळे लोकप्रतिनिधींची गोची : वर्ध्यासह हिंगणघाट मतदारसंघाला सर्वाधिक झळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार क्षेत्रातील एकूण ५१९ ग्रामपंचायतीपैकी २९८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने संपूर्ण जिल्ह्यातच आचारसंहिता लागली आहे. संपूर्ण जिल्ह्याला आचारसंहिता असलेला वर्धा जिल्हा हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात आता ना भूमिपूजन होणार ना पायभरणी. वर्धा आणि हिंगणघात या दोन मतदार संघातील सर्वाधिक ग्रामंपचायतीच्या निवडणुका असल्याने आचारसंहितेची या मतदार संघाला झळ बसली असून लोकप्रतिनिधींची गोचीच झाली आहे.दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत भाजपाचीच सत्ता असल्याने वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघातील वर्धा व हिंगणघाट मतदार संघात भाजपचे आमदार आहेत तर आर्वी व देवळी विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे आमदार आहेत. शिवाय खासदारही भाजपाचे आहे. असे असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी उद्घाटने व पायाभरणीचा धडाका लावा, अशा सूचना दिल्या आहे. तसेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ९ मार्चपासून लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. मात्र, वर्धा जिल्ह्यात २४ मार्चला २९८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर २६ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुका होऊ घातल्याने या निवडणुकीची २० फेब्रुवारीपासूनच सर्वत्र आचारसंहिता जाहीर करण्यात आली. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या भूमिपूजन व पायभरणी कार्यक्रमावर विरजण पडले आहे. परिणामी लोकप्रतिनिधींचीही अडचण वाढली आहे. विशेषत: वर्धा व हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात भाजपाचेच आमदार असताना याच मतदार संघातील अर्ध्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने येथील लोकप्रतिनिधींना आता ना भूमिपूजन ना पायाभरणी करता येणार असल्याने गोची झाली आहे. ग्रामपंचायतीची आचारसंहिता संपताच लोकसभेची आचारसंहिता लागणार असल्याने या मतदारसंघात आता निवडणुकीपूर्वी कोणतीही विकासकामे करता येणार नाही.बॅकडेटचा फंडा ठरतोय मदतगारग्रामपंचायतीच्या आचारसंहितेमुळे भूमिपूजन व लोकार्पणाला ब्रेक लागला आहे. तसेच कोणत्याही नवीन योजनेची घोषणा करता येत नाही आणि नवीन कामाचे कार्यारंभ आदेशही देता येत नाही. असे असले तरी काहींनी आपल्या मतदार संघातील किंवा महत्वाच्या ग्रामपंचायतीमधील कामाचे बँकडेटमध्ये कार्यारंभ काढण्याचाही खटाटोप चालविला आहे. त्यामुळे त्या कामांचे भूमिपूजन करता येणार आहे. परंतु, या गडबडघाईत अनेक कामांच्या दिशा व स्थानही चुकल्याचे बोलेल्या जात आहे. असे असताना आता या कामाचे लोकप्रतिनिधी भूमिपूजन करणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.शहरालगतच्या ग्रामपंचायतींच्याही निवडणुकावर्धा शहरालगतच्या दहा ग्रामपंचायती या सर्वात मोठ्या ग्रामपंचायती असून वर्धा विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीवर परिणाम कारक ठरतात. या दहा ग्रामपंचायतीपैकी पिपरी (मेघे) ग्रामपंचायत वगळता सर्वच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका असल्याने आचारसंहिता लागली आहे. त्यामुळे या परिसरातील विकास कामे करण्यासाठी आता मोठी अडचण निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतींची आचारसंहिता संपताच लोकसभेची आचारसहिंता लागणार आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने आता या परिसरात विकासात्मक कामे नव्याने करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या विकास कामांवरच नागरिकांना समाधान मानावे लागेल.