चिन्मय पंडीत नवे अतिरिक्त पोलीस अधीक्षकवर्धा : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांची ठाणे येथे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी वर्धेत निर्मलादेवी एस. यांची वर्णी लागली आहे. तर याच वेळी जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्मिता पाटील यांचीही खंडाळा येथे प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी चिन्मय पंडीत यांची वर्णी लागली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रूजू झालेल्या निर्मलादेवी या नागपूर येथे नागरी हक्क संरक्षण विभागात कार्यरत होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळण्याची त्यांची ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा पोलीस विभागात आहे. यामुळे त्यांच्याकडून जिल्ह्याच्या अपेक्षा वाढणार आहे. त्या सोमवारी पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. त्यांच्यासह चिन्मय पंडीतही सोमवारीच आपला कार्यभार सांभाळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यातील दारूबंदी आणि इतर गुन्ह्यांवर हे दोन्ही नवे अधिकारी कसा पायबंद लागवतात याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)
निर्मलादेवी एस. वर्धेच्या नव्या एसपी
By admin | Updated: April 30, 2017 01:02 IST