नव्यानेच बांधलेला पूल गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 11:23 PM2019-11-02T23:23:14+5:302019-11-02T23:28:18+5:30

कंत्राटदार आणि जि. प. बांधकाम विभागाच्या गैरप्रकारामुळे शेतकºयांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक शेतकरी डोक्यावरुन सोयाबीनची पोती व कापसाचे गाठोडे नेत आहे. तरीही संबंधित कंत्राटदार व अभियंत्याला जाग आली नाही. पुलाची दुरुस्ती करण्याबाबतचे आश्वासन कंत्राटदाराने संबंधित शेतकऱ्याला दिले.

The newly built bridge is carried away | नव्यानेच बांधलेला पूल गेला वाहून

नव्यानेच बांधलेला पूल गेला वाहून

Next
ठळक मुद्देबांधकामाला झाला एक महिना। रामपूर ते पिपळधरी वहिवाट ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क
विरूळ (आकाजी) : नजीकच्या रामपूर ते पिपळधरी या रस्त्यावरील नाल्यावर मे ते जून महिन्यात लाखो रुपये खर्च करून जिल्हा परिषदेअंतर्गत मोठा पूल उभारन्यात आला. त्यामुळे या रस्त्यावरील शेतकऱ्यांची मागील पन्नास वर्षांपासून बंद असलेली वहिवाट सुरळीत झाली. मात्र, जून महिन्यातील पहिल्याच पावसात हा पूल वाहून गेल्याने बांधकामाच्या दर्जाविषयी प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुलाचे तातडीने नव्याने बांधकाम करण्यात यावेश अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आर्वी येथील कंत्राटदार व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अभियंत्यांनी पुलाच्या बांधकामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला. परिणामी, अवघ्या एका महिन्यातच नव्याने बांधलेला पूल जून महिन्यात झालेल्या पावसाने पूर्णपणे वाहून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांची परत वहिवाट बंद झाली आहे. पुलाअभावी शेतातील काढणीला आलेला शेतमाल या रस्त्याअभावी शेतातच पडून असल्याने खराब होत आहे.
कंत्राटदार आणि जि. प. बांधकाम विभागाच्या गैरप्रकारामुळे शेतकºयांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक शेतकरी डोक्यावरुन सोयाबीनची पोती व कापसाचे गाठोडे नेत आहे. तरीही संबंधित कंत्राटदार व अभियंत्याला जाग आली नाही. पुलाची दुरुस्ती करण्याबाबतचे आश्वासन कंत्राटदाराने संबंधित शेतकऱ्याला दिले. आता मात्र, कंत्राटदार उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत लोकप्रतिनिधी एक शब्दही बोलायला तयार नाहीत. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मुजोर कंत्राटदारावर कारवाई करीत या पुलाचे बांधकाम तातडीने सुरू करावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: The newly built bridge is carried away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.