शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

ईएमओच्या दुर्लक्षाने नवजात बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 22:19 IST

येथील आरोग्य उपकेद्रात आलेल्या गरोदर मातेला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्याकरिता १०८ रुग्णवाहिका बोलावण्यात आली. पण, आलेल्या रुग्णवाहिकेतील ईएमओने (इमर्जन्सी मेडिकल आॅफिसर) कन्नमवारग्रामला जाणे गरजेचे असल्याचे सांगून रुणवाहिका न थांबवता पुढचा रस्ता धरला.

ठळक मुद्देरुग्णवाहिका न थांबविता धरला पुढचा मार्ग : आरोग्य उपकेंद्रात कुटुुुंंबीयांचा आक्रोश

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : येथील आरोग्य उपकेद्रात आलेल्या गरोदर मातेला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्याकरिता १०८ रुग्णवाहिका बोलावण्यात आली. पण, आलेल्या रुग्णवाहिकेतील ईएमओने (इमर्जन्सी मेडिकल आॅफिसर) कन्नमवारग्रामला जाणे गरजेचे असल्याचे सांगून रुणवाहिका न थांबवता पुढचा रस्ता धरला. परिणामी वेळीच उपचार न मिळाल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली असून कुटूबींयानी उपआरोग्य केंद्रात आक्रोश करुन संताप व्यक्त केला.आकोलीच्या गोसावी नगरातील जयवंता रवि माईंदे या गरोदर मातेला प्रसुतीसाठी सकाळी पावणे दहा वाजता आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. यावेळी उपकेंद्रात मसाळा लघू आरोग्य केंद्राच्या परिचारिका अर्चना बावणे, आशा वर्कर नम्रता खैरकार व अंगणवाडी सेविका संगीता पिंपळे उपस्थित होत्या. गरोदर मातची प्रकृती बघता परिचारिका बावणे यांनी १०८ क्रमांकावर फोन करुन तातडीने रुग्णवाहिका पाठविण्याची विनंती केली. काही वेळाने उपआरोग्य केंद्राजवळ रुग्णवाहिका पोहचली.पण, रुग्णवाहिकेतील ईएमओने येथील रुग्णाच्या अवस्थेकडे दुर्लक्ष करीत कन्नमवारग्रामला जाणे खूप महत्वाचे आहे ,असे सांगून रुग्णवाहिका पुढे दामटली. त्यामुळे पुन्हा परिचारिका बावणे यांनी १०८ वर संपर्क साधून दुसरी रुग्णवाहिका बोलावली. त्यानुसार रुग्णवाहिका पोहोचलीही परंतू तोपर्यंत स्त्री लिंगी बाळाचा मृत्यू झाला होता. बाळाचा मृत्यू झाल्यानंतर मातेवर उपचार होणे गरजेचे असताना नातेवाईकांनी एकच गोंधळ घातल्याने उपचारात अडचणी येऊ लागल्या. संतप्त नातेवाईकांनी टेबलवरील साहित्याची फेकाफेक सुरू केली. मातेचा विचार करुन उपस्थित सोमनाथ सोळंकी, अरविंद काकडे, मधुकर देवढे, दिलीप बेनपे, लालगिर भुराणी यांनी कुटुंबीय व समाजातील महिला,पुरुषांची समजूत काढली. तेव्हा जमाव शांत झाल्याने मातेला पुढील उपचाराकरिता सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले.नातेवाईकांच्या मागणीनुसार बाळाचे शवविच्छेदन केले. त्यावरुन बाळाचा मातेच्या पोटातच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. सध्या मातेवर उपचार सुरु असून प्रकृती धोक्याबाहेर आहे.घरीच बाळंतपण करण्याची मानसिकता बदलण्याची गरजआकोली आरोग्य उपकेद्राच्या कार्यक्षेत्रात पारधी, बेलदार आणि गोसावी समाजाची संख्या लक्षणीय आहे. आजही त्यांचा कल घरीच बाळंतपण करण्याकडे असतो. रुग्णाला अगदी वेळेवर दवाखाना व उपकें द्रात आणतात. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचीही धावपळ होत असल्याने या समाजाची मानसिकता बदलविण्यासाठी प्रबोधनाची गरज असल्याचे बोलले जात आहे.येथील आरोग्य सेविका सयाम यांना निलंबित केल्यानंतर त्यांचा पदभार कुणाकडेही सोपविण्यात आला नाही. त्यामुळे रुग्णांच्या सेवेचा विचार करून त्यांचा प्रभार सोपविण्याची गरज व्यक्त होत असल्याने वरिष्ठांनी लक्ष द्यावे.

टॅग्स :Healthआरोग्यDeathमृत्यू