शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
2
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
5
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
6
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
7
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
8
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
9
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
10
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
11
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
12
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
13
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
14
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
15
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
16
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
17
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
18
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
19
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
20
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...

नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईची लगबग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 02:39 IST

हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, अर्थातच गुढीपाडवा. या हिंदू नववर्षाचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात आणि शोभा यात्रांच्या जल्लोषात साजरा करण्याची पद्धत गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे.

मुंबई : हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, अर्थातच गुढीपाडवा. या हिंदू नववर्षाचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात आणि शोभा यात्रांच्या जल्लोषात साजरा करण्याची पद्धत गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे. यंदाचे वर्षही त्याला अपवाद नाही. शहर आणि उपनगरांत विविध संस्था व संघटनांनी रविवारी गुढीपाडव्याच्या निमित्ताने नववर्ष स्वागत यात्रांचे आयोजन केले आहे. या नववर्ष स्वागत यात्रांनी अवघी मुंबापुरी दुमदुमणार आहे. त्यामुळे या स्वागत यात्रांच्या तयारीसाठी सध्या सर्वत्रच तरुणाईची लगबग दिसून येतेय.गिरगाव, मुलुंड, बोरीवली, दादर, लालबाग अशा सर्वच भागांमध्ये नववर्ष स्वागत यात्रांमध्ये आबालवृद्ध सहभागी होत असले, तरीही पारंपरिक पेहरावात सहभागी होणाºया तरुणाईची उपस्थिती विशेष लक्षणीय असते. या स्वागत यात्रेत ढोल-ताशा, लेझिम पथके, स्कूटर किंवा मोटारसायकवरील तरुण-तरुणी, हाती भगवे ध्वज घेतलेले नागरिक, गणपतीची पालखी, सामाजिक संदेश देणारे विविध चित्ररथ व देखावे आदींचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो.स्वागत यात्रांमध्ये पालखी, दिंडी, रथ, घोडागाडी, बैलगाड्यांसह ढोल व लेझिम पथकाचा समावेश असणार आहे. सांस्कृतिक ध्वजपथक, पारंपरिक ढोलपथक, लहान मुलांचे लेझिम पथक, महिलांचे झांज पथक, मानवी मनोरे व तलवारबाजीची प्रात्यक्षिके, विविध संस्थांचे चित्ररथ हे येथील खास आकर्षण असणार आहे.>ढोल-ताशा पथकांना मोठी मागणीगुढी पाडवा जसा जवळ येऊ लागला आहे, तसतसा सरावही वाढू लागला आहे. आम्ही दररोज सायंकाळी तीन तास सराव करतो. आमच्या पथकात शाळेत जाणाºया लहान मुलांपासून ते नोकरदार तरुणांपर्यंत सर्वांचा सामावेश आहे. ३० ते ३५ जण नित्यनियमाने सरावाला येतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही जोगेश्वरी येथे ढोल-ताशा वाजविण्याची आॅफर मिळाली आहे. बरीच मंडळे पारंपरिकरीत्या सण साजरे करतात. अशांना ढोल-ताशा पथकच स्वागत यात्रांसाठी लागते. त्यामुळे ढोल-ताशा पथकांना मोठी मागणी आहे. - तेजश्री परब, संघर्ष ढोल ताशा पथक (जोगेश्वरी)मुलींचे विशेष पथक सज्ज!गुढी पाडव्याच्या निमित्ताने वेगळा सराव करत नाही. आमचा रोजचा सराव सुरू आहे. यंदा पथकाला गुढी पाडव्याच्या स्वागत यात्रेसाठी शिवसेना भवन आणि वाशी येथील एन.आर.ए. नगर या दोन ठिकाणी बोलावणे आहे. एन.आर.ए. नगर येथे फक्त मुलींच्या ढोल-ताशा पथकाला मागणी आहे. डीजे रात्री १० नंतर बंद केला जातो. त्यामुळे मोठ्या मंडळांकडून ढोल-ताशा पथकाला जास्त मागणी आहे.- सायली गमरे, सामना ढोल-ताशा ध्वज पथक (परळ)>साडीचा हटके लूकआजकाल सगळ्याच सांस्कृतिक सोहळ्यात साडी नेसण्याचा जणू ट्रेंडच आला आहे. काळ कितीही फॅशनेबल झाला, तरी साडीची किमया कधीच कमी होणार नाही. उलट त्यात बदल होत, काही वेळा फ्युजनचा टच देत, या पेहरावाला आणखी देखणे बनविले जाते. साडीचे सौंदर्य आणखी वाढविण्यासाठी सध्या ब्लाउजवर बरेच काम होऊ लागलेय. साडी प्लेन असली तरी चालेल, पण ब्लाउज डिझायनर हवा, असा अनेकींचा आग्रह असताना, त्यांच्यासाठी आता टॉप ब्लाउजचा आणखी एक नवा प्रकार आकर्षित करणारा ठरेल.शर्ट पॅटर्न ब्लाउजची फॅशन तशी जुनी झाली. आता ट्रेंड आहे, तो टॉप पॅटर्न ब्लाउजचा. म्हणजे साडीवर चक्क जीन्स, घागरा किंवा स्कर्टवर खरेदी केलेला टॉप हा ब्लाउज म्हणून घालून, तुम्ही तिचे आणि अनुषंगाने तुमचेही सौंदर्य वाढवू शकता. क्रॉप, फ्रील, नेटेट, बांधणी, राजस्थानी किंवा क्रोशा वर्क असलेले वॉर्डरोबमधील विविध प्रकारचे टॉप तुम्ही साडीवर ब्लाउज म्हणून नव्याने वापरण्याची फॅशन आहे.>इंडो वेस्टर्न लूककेवळ साडी किंवा सदरा-लेंगा असा ‘टिपिकल’ लूक न ठेवता, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रीयन कपड्यांना इंडो वेस्टर्न टच दिला जातोय. यंगस्टर्सना आवडणारा हा लूक सध्या ट्रेंडमध्ये आहे. पैठणी, इरकली, नागपुरी चेक्स, नारायणी पेठ, खानदेशी कापड, गोंदिया प्रदेशात वापरले जाणारे चेक्सचे कापड यांना इंडो-वेस्टर्न लूक देण्यात येतो, तसेच अनारकली, जॅकेट्स, खानदेशी कपड्यांचे ब्लाउज, स्कर्ट, गाउन्स या सगळ्यांना काठापदराची बॉर्डर लावून डिझाइन केले जाते. या सगळ्या कपड्यांवर मराठमोळे दागिने अगदी खुलून दिसतात.>पारंपरिक वाद्यांकडे कलनववर्षाच्या स्वागतासाठी आमचे ढोल पथक सज्ज आहे. आजकालच्या तरुणाईचा कल डीजेपेक्षा ढोल-ताशा या पारंपरिक वाद्याकडे आहे. त्यामुळे दर रविवारी सकाळी ११ ते ४ सायं. वाजेपर्यंत विद्यार्थी, नोकरदार वर्ग कामातून वेळ काढून ढोल पथकात सहभागी होऊन सराव करत आहेत. ढोल-ताशा पथकातून मिळणाºया मानधनाचा वापर सामाजिक कार्यासाठी केला जातो.- मनीष टाले, अध्यक्ष,संस्कृती वाद्य पथक (कल्याण)

टॅग्स :gudhi padwaगुढी पाडवा