शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

निष्काळजीपणा; शिक्षण हक्कावर टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 22:13 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पहिल्याच सोडतीमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशासाठी शाळा किंवा जिल्हा परिषद शिक्षण विभागाशी संपर्क साधला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील २७३ विद्यार्थी आता प्रवेशाकरिता अपात्र ठरले आहे.

ठळक मुद्दे‘आरटीई’पासून २७३ विद्यार्थी वंचित : संपर्क न करणारे विद्यार्थी ठरले अपात्र

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पहिल्याच सोडतीमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशासाठी शाळा किंवा जिल्हा परिषद शिक्षण विभागाशी संपर्क साधला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील २७३ विद्यार्थी आता प्रवेशाकरिता अपात्र ठरले आहे. अपात्र ठरलेल्या या विद्यार्थ्यांना आरटीईतील प्रवेशापासून वंचित रहावे लागणार असून पालकांच्या निष्काळजीमुळेच या विद्यार्थ्याच्या ‘शिक्षण हक्का’ वर गदा आल्याचे दिसून येत आहे.बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता जिल्ह्यातील आठही तालुक्यातील १३३ शाळांमध्ये १ हजार ४०३ जागांसाठी सुरु असलेल्या आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ३ हजार ९९५ आॅनलाईन अर्ज आले. त्यासाठी झालेल्या पहिल्या सोडतीत १ हजार १०७ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले. पहिल्या फेरीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांना वेळोवेळी मोबाईलवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून माहिती देण्यात आली. प्रवेशाकरिता दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही १० मे या अंतिम तारखेपर्यंत जिल्ह्यातील पालकांनी शाळा, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे संपर्क साधला नाही. परिणामी २७३ विद्यार्थी आरटीईच्या प्रवेशासाठी अपात्र ठरले आहे. विशेषत: पहिल्या फेरीत अपात्र ठरलेल्या या विद्यार्थ्यांना आता दुसऱ्या फेरीत प्रवेश घेता येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना या मोफत प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे.कागदपत्रांअभावी १७ अर्ज ‘रिजेक्ट’आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेत १७ अर्ज कागदपत्राच्या त्रुटीत अडकल्याने या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने अपात्र ठरविले आहे. यामध्ये देवळी व सेलू तालुक्यात प्रत्येकी एक, हिंगणघाट तालुक्यात दहा तर वर्धा तालुक्यात ५ असे एकूण १७ विद्यार्थी अपात्र ठरविण्यात आले आहे. यामध्ये जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र व जन्माचा दाखला आदी प्रमाणपत्रातच त्रुट्या आढळून आल्या. या १७ विद्यार्थ्यांपैकी जवळपास ४ ते ५ विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र हे महाराष्ट्राबाहेरील राज्यातील असल्याने त्यांना प्रवेशापासून मुकावे लागले. या विद्यार्थ्यांनी सर्वसाधारण प्रवर्गातून आॅनलाईन अर्ज केला असता तर त्यांच्या प्रवेश मिळाला असता, असे शिक्षण विभागाने सांगितले.अपात्रतेत वर्धा तालुका अव्वलआरटीईअंतर्गत आठही तालुक्यात काही प्रमाणात विद्यार्थी अपात्र ठरलेले आहेत. ज्यामध्ये कागदपत्रामधील त्रुटी किंवा संपर्क न करणे अशा कारणांचा समावेश आहे. सर्वाधिक १०० विद्यार्थी वर्धा तालुक्यात अपात्र ठरले आहे.आर्वी तालुक्यात २०, आष्टी १७, देवळी ५५, हिंगणघाट ५०, कारंजा १३, समुद्रपूर ११ तर सेलू तालुक्यात ७ असे एकूण २७३ विद्यार्थी आरटीई प्रवेश प्रक्रि येत अपात्र ठरले आहेत. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार नाही.पहिली फेरी संपली असून त्यातील प्रवेश प्रक्रियाही आटोपली. आता दुसरी फेरी २० मे नंतर होण्याची शक्यता शिक्षण विभागाने वर्तविली आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी