शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे-फडणवीस सरकार वोक्के, पण जनतेचे जीवन झाले फिक्के; वर्ध्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा हल्लाबोल

By अभिनय खोपडे | Updated: September 1, 2022 18:15 IST

वर्धेच्या छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

वर्धा : ऐन सनासुदीच्या काळात  महागाईने उच्चांक गाठला आहे. सामान्य जनता साध जीवन जगण्यासाठी संघर्ष करत आहे. असे असतांना नव्याने आलेलं शिंदे-फडणवीस सरकार केवळ उत्सवात दंग असून, पोकळ घोषणा करीत आहे. याच्या निषेधार्थ आज (दि. १) वर्धेच्या छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

वर्धा जिल्हा हा पूरग्रस्त असून शेतकरी विजेच्या तार तोंडात घेवून, नदीत उडी मारून आत्महत्या करीत आहे. पण या खोकेबहाद्दर सरकारला, व त्यांच्या आमदार खासदार यांना मात्र स्वत:च्या मंत्रिपदाच्या भाऊगर्दित फुर्सत नाही. पन्नास खोके, शिंदे सरकार वोक्के, महागाईकडे दुर्लक्ष करणार्‍या शिंदे भाजप सरकारचा निषेध असो, अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिल्या.

राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, यांनी राष्ट्रवादी जिल्हा काॅंग्रेसचे अध्यक्ष सुनिल राऊत व युवकचे अध्यक्ष संदीप किटे यांचे नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. नवे शिंदे-फडणवीसांचे हे खोके सरकार केवळ आश्वासन देणारे सरकार आहे. मेट्रो, गुजरातची मेट्रो ट्रेन, विविध स्मारके यांचेसाठी हजारो कोटी खर्च करण्यासाठी यांच्याजवळ पैसे आहेत. पण सामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी मात्र उपाय नाहीत, उपाययोजना नाहीत.

शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या पुस्तक पेनवर कर लावणार हे भाजपचं सरकार, आतापर्यंत देशातील व महाराष्ट्रातील अतिशय नालायक व जनविरोधी सरकार आहे. शेतकर्‍यांना छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेवून, शपथ देवून आत्महत्या करू नका, असा उपदेश देणारे मुख्यमंत्री फक्त नौटंकी करून, केवळ आपल्या पक्षाच्या आमदारांना हजारो कोटी वाटत आहेत आणि शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडत आहे, असे आरोप करत शिंदे व फडणवीस सरकारचा राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने, जाहीर निषेध करण्यात आला.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसwardha-acवर्धा