शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शेताला आले तलावाचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 00:23 IST

देवळी तालुक्यातील चिखली येथील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी अडविण्यात आल्यामुळे लगतच्या शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होत आहे. महसूल विभागाने शेतातील पाणी वाहून जाण्याचा मार्ग मोकळा करावा, याबाबत देवळी तहसीलदारांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देचिखली येथील घटना : पिकांचे नुकसान, तहसीलदारांकडे तक्रार; पाण्याचा मार्ग मोकळा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : देवळी तालुक्यातील चिखली येथील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी अडविण्यात आल्यामुळे लगतच्या शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होत आहे. महसूल विभागाने शेतातील पाणी वाहून जाण्याचा मार्ग मोकळा करावा, याबाबत देवळी तहसीलदारांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. कार्यवाहीकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.देवळी तालुक्यातील चिखली येथील शेतकरी चंद्रशेखर महादेव थूल यांच्या शेतातील पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यांचे मौजा चिखली येथे शेत सर्व्हे क्रमांक ३९७ असून यांच्या शेताच्या खालील बाजूस पूर्व दिशेने तक्रारकर्त्याचे शेत आहे.२०१७ साली शेत दुरुस्ती योजनेअंतर्गत विकासाच्या बांध्या शेतामधून करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शेतकºयांच्या शेतातील पाणी हे सरळ बांधाने वाहून जात असे. तसेच कालव्यावर पुलाचेदेखील बांधकाम करण्यात आले होते.मात्र, पूर्व दिशेने शेती असलेल्या शेतकºयाने कालव्याच्या पुलावर स्वखर्चाने मुरमाचा भरावा टाकला. परिणामी, पावसाळ्यातील येणारे पाणी वाहून जाण्यात अडथळा निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी शेतातच साचून राहते. यामुळे शेतकºयाच्या शेतातील उभ्या पिकाचे नुकसान होत आहे. तसेच शेती व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे. पुलावर टाकलेला भरावा त्वरित हटवावा व शेतात साचलेले पाणी वाहून जाण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी शेतकरी चंद्रशेखर थूल यांनी प्रशासनाकडे केली आहे.पिके धोक्यात; नुकसान भरपाई देणार कोण?सेवाग्राम - शेती जगण्याचे साधन असून वर्षभर शेतात राबून शेती पिकविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. पावसामुळे पिकांना उभारी मिळाली. मात्र, रस्त्याच्या कामामुळे बांधा बुजविण्यात आल्याने शेती जलमय झाल्याची माहिती चाणकी येथील अरविंद पन्नासे आणि श्रीकांत राऊत यांनी दिली. सेवाग्राम ते हमदापूर, पुढे काढळीपर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. यात काही ठिकाणी दोन्ही बाजूने तर काही ठिकाणी एका बाजूने रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शिवनगर ते हमदापूर या दरम्यान तीन ठिकाणी पुलाचे काम करण्यात आल्याने वाहनांकरिता सुविधेचे झालेले आहे. पण, रस्त्याच्या रूंदीकरणात मुरमाचा भराव देण्यात आला. यात चाणकी शिवारात रस्त्याच्या बाध्या चक्क बुजवून रस्ता वाढविण्यात आला. तर राऊत आणि पन्नासे यांच्या शेताजवळील पाटबंधारे विभागाचा ढोला मुरमाने बुजविण्यात आला. पाच दिवस सतत पाऊस झाल्याने पाण्याला पुढे जाण्यास वाटच मिळाली नसल्याने पºहाटी, सोयाबीन पीक असलेल्या शेताला तलावाचे स्वरूप आलेले आहे. पिके धोक्यात आल्याने शेतकरी संतापले आहेत.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती