वर्धा : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील रिलायंस पेट्रोल पंपाजवळ दोन मोटरसायकल एकमेकांवर आदळल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यु झाला. तर एक गंभीर जखमी असून उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले. ही घटना गुरूवारला रात्री ८.३० वाजता घडली. सतीश वामनराव चाफले (२६) रा. यवती, ता. राळेगांव, जि. यवतमाळ, व अतुल पवार (२७) रा. गव्हा (कोपरा), ता. समुद्रपूर अशी मृतांची नावे आहे.प्राप्त माहितीनुसार सतीश चाफले (२६) व महेश कुंडलिक चतारे (२५) रा. संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट हे दोघेही जाम येथून एम.एच. ३४ एई. ६८२७ क्रमांकाच्या मोटरसायकलने महामार्ग पोचमागार्ने हिंगणघाटकडे येत होते. तर अतुल पवार हा मोटरसायकल क्रमांक एम.एच. ३२ झेड ११७८ ने गावाकडे जात असतांना दोन्ही मोटारसायकल एकमेकांवर धडकल्या. या अपघातात सतीशच्या डोक्याला जबर मार लागून जागीच मृत्य झाला. तो गिमाटेक्स मध्ये तारतंत्री म्हणून कार्यरत होता. तर अतुल पवार याचा उपचारा दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात मृत्यु झाला. अपघातात जखमी झालेल्या महेश चतारे याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपचारार्थ नागपुरला येथे हलविण्यात आले आहे. या अपघाताची पोलिसांनी नोंद घेतली असुन उपनिरीक्षक विनोद कांबळे, नितिन येसनकर, संजय राऊत तपास करीत आहे.
वर्ध्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर मोटरसायकल अपघातात दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 13:51 IST
येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील रिलायंस पेट्रोल पंपाजवळ दोन मोटरसायकल एकमेकांवर आदळल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यु झाला. तर एक गंभीर जखमी असून उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले. ही घटना गुरूवारला रात्री ८.३० वाजता घडली.
वर्ध्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर मोटरसायकल अपघातात दोघे ठार
ठळक मुद्देहिंगणघाट येथील घटना एक गंभीर जखमी