शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

देशी जवस तेलाची लज्जतच न्यारी! वर्धा जिल्ह्यातील गिरड प्रसिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 14:53 IST

तेलस्वराज्य चळवळीच्या माध्यमातून नागरिकांना आणि शासनाला जागृत करण्यासाठी वर्ध्याच्या मगन संग्रहालयाने जवस उत्पादन प्रक्रिया तेल विक्री पुनर्जीवित केले आहे.

ठळक मुद्देजवस उत्पादन प्रक्रिया तेल विक्री पुनर्जीविततेल स्वराज्य चळवळीला गती मगन संग्रहालयाचा उपक्रम

सुधीर खडसे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एकेकाळी अन्नधान्याच्या कौटुंबिक गरजा शेतीतून पूर्ण व्हायच्या. बाजारातून गूळ आणि मीठ घेतले की, ग्रामीण जनतेचा प्रपंच चालायचा. मात्र, आता सर्वच जीवनोपयोगी वस्तूंविषयी परावलंबी झाले आहेत. सध्या खाद्य तेलात होत असणाऱ्या भेसळीमुळे कोणते तेल खावे, याचा प्रत्येकालाच पेच पडला आहे. तेलस्वराज्य चळवळीच्या माध्यमातून नागरिकांना आणि शासनाला जागृत करण्यासाठी वर्ध्याच्या मगन संग्रहालयाने जवस उत्पादन प्रक्रिया तेल विक्री पुनर्जीवित केले आहे. गिरड येथे नैसर्गिक शेती विकास केंद्रात तेल उत्पादन केले जात आहे. खाद्यपदार्र्थाच्या चवीतून गेलेली देशी तेलाची गोडी पुन्हा परतल्याने जवस तेलाला पसंती मिळत आहे.संपूर्ण विदर्भात अन्नधान्याची एकीकाळी समृद्धी होती. मात्र, कालांतराने एकल पीक पद्धतीमुळे मिश्र शेतीचा ºहास झाला असताना पारंपरिक पीकपद्धती टिकवून ठेण्यासाठी मगन संग्रहालय समितीने चळवळ सुरू केली आहे. नामशेष झालेल्या जवसाची लागवड ते तेल उत्पादन करीत बापूंच्या तेल घाणीला तेलस्वराज्य चळवळीतून उभारी दिली आहे.गिरड येथील मगन संग्रहालयाच्या नैसर्गिक शेती विकास केंद्रात ही बापूंची घाणी सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा जवस लागवडीकडे कल वाढला आहे. जवस उत्पादन ते शुद्ध तेलनिर्मिती प्रक्रियेमुळे ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. यामुळे आता जवस पिकाला ‘अच्छे दिन’ येत आहेत.जिल्ह्यात पूर्वी जवस पेरा क्षेत्र कमालीचे होते. गावोगावी तेल घाण्या असायच्या. मात्र, आता सर्वच जीवनोपयोगी वस्तूंविषयी परावलंबी झाले आहे. गेल्या दशकात कृषी विभागाच्या शासकीय अहवालातील तेल बीज व जवस पेºयाचा आकडा शून्य आहे. मात्र, मगन संग्रहालय समितीच्यावतीने जवस बियाणे संवर्धनाचे काम हाती घेण्यात आल्याने यावर्षी ४० एकरात जवस पेरणी क्षेत्र आहे.बाजारातून मिळणाऱ्या तेलात मोठी भेसळ करण्यात येत असल्याने त्याचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. तसा शासकीय आरोग्य यंत्रणेचा अहवाल असला तरी महागाईच्या काळात स्वस्त मिळेल तेच तेल नियमित स्वयंपाकात वापरले जात आहे. याचाच विपरीत परिणाम तेल घाणी व्यवसायावर झाल्याने अखेरची घरघर लागली. मात्र, आता नागरिकांना जवस तेलाचे महत्त्व पटू लागल्याने उत्पादनापेक्षा मागणी वाढल्याची माहिती नैसर्गिक शेती विकास केंद्राचे प्रमुख गजानन गारघाटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

तेल स्वराज्य आंदोलनाच्या माध्यमातून खाद्य तेलाच्या धोरणासंदर्भात सरकारकडे रास्त मागण्या केल्या. ताजे शुद्ध तेल काढणाऱ्या घाण्यावर कुठलेही निर्बंध लावू नये, आरोग्याला घातक विदेशी तेलाच्या आयातीवर बंदी घालावी, तेल विकणाºया बहुराष्ट्रीय कंपन्यांना प्रतिबंधित करावे, प्रशासनाकडून विदेशी खाद्य तेलापासून मानवी शरीरावर होणारे घातक परिणामाविषयी जनजागृती करावी. विदेशी तेलावर जी.एम. सोयाबीन, बी.टी. सरकीपासून बनलेले तेल असा स्पष्ट उल्लेख करावा, तेलातील भेसळ व त्याचे प्रमाण स्पष्ट पाकिटावर लिहावे, या तेलामुळे होणारे शारीरिक व मानसिक नुकसान नमूद करावी, आदी मागण्यांसंदर्भात शासनाने सजग राहून नागरिकांच्या जीवनाशी होणारा खेळ थांबवावा, अशी मागणी केलेली आहे.डॉ.विभा गुप्ताअध्यक्ष, मगन संग्रहालय समिती, वर्धा

 

 

टॅग्स :agricultureशेती