शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

‘मेडीकल कंसल्टेशन चार्ज’च्या नावावर आर्थिक पिळवणूक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 06:00 IST

डॉक्टर किती प्रसिद्ध त्यानुसार त्या डॉक्टराची सदर फी ठरत असून रुग्णाने आजाराबाबत अधिक विचारणा केल्यावर वैद्यकीय अनेक खासगी डॉक्टरांकडून उडवा-उडवीची आणि असमाधानकारक उत्तरे दिली जात असल्याचे बघावयास मिळते.

ठळक मुद्देअधिक शुल्क आकारणीमुळे रुग्णांसह नातेवाईक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सध्या डेंग्यू, मलेरिया या किटकजन्य आजारांसह व्हायरल ताप, स्क्रप टायफस आदी आजार डोके वर काढू पाहत आहे. परंतु, ‘मेडीकल कंसल्टेशन चार्ज’च्या नावाखाली अनेक खासगी डॉक्टर रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांकडून मनमर्जी फी उकळत असल्याचे दिसून येते. डॉक्टर किती प्रसिद्ध त्यानुसार त्या डॉक्टराची सदर फी ठरत असून रुग्णाने आजाराबाबत अधिक विचारणा केल्यावर वैद्यकीय अनेक खासगी डॉक्टरांकडून उडवा-उडवीची आणि असमाधानकारक उत्तरे दिली जात असल्याचे बघावयास मिळते. मेडीकल कंसल्टेशनच्या नावाखाली सध्या रुग्णांसह रुग्णांच्या कुटुंबीयांची आर्थिक पिळवणूक होत आहे.वर्धा जिल्ह्यात ४३ मॅटनिटी रुग्णालय, ५ नेत्र खासगी रुग्णालय, एक कॅन्सर खासगी रुग्णालय, ५ आर्थाे खासगी रुग्णालय, तीन बालरोग खासगी रुग्णालय, २६ इतर खासगी रुग्णालये असल्याचे नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. पूर्वी नाममात्र खासगी रुग्णालये जिल्ह्यात होते तर सध्या दिवसेंदिवस जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. इंडियम मेडीकल कॉन्सीलच्या नियमानुसार प्रत्येक खासगी डॉक्टरांच्या रुग्णालयात त्या डॉक्टराची वैद्यकीय सल्लामसलत (मेडीकल कंसल्टेशन) शुल्क किती याबाबतचा फलक असणे क्रमप्राप्त आहे. परंतु, काही बोटावर मोजण्या इतक्याच खासगी डॉक्टरांच्या रुग्णालयात हा नियम पाळल्या जात असल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे तर एकसारखे शिक्षण घेतलेल्या खासगी डॉक्टरांपैकी एक डॉक्टर १०० रुपये तर दुसरा खासगी डॉक्टर वैद्यकीय सल्ला मसलतच्या नावाखाली रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांकडून ३०० ते ४०० रुपये उकळत असल्याने हा प्रकार रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणाराच ठरत असून कुठलीही पावती खासगी डॉक्टर देत नाहीत.समाधान महत्त्वाचेमेडीकल कन्सल्टेशनच्या नावाखाली शुल्क घेणाऱ्या खासगी डॉक्टराने रुग्णाला असलेल्या आजाराबाबत रुग्णासह त्यांच्या कुटुंबीयांना योग्य सल्ला देणे क्रमप्राप्त आहे. शिवाय त्यांचे समाधान करणेही महत्त्वाचे आहे. कुठलाही खासगी डॉक्टर उडवा-उडवीचे उत्तर देत असल्यास रुग्णासह त्याच्या नातेवाईकाला जिल्हा शल्य चिकित्सकाकडे लेखी तक्रार करता येते.कुठल्या खासगी डॉक्टराने किती मेडीकल कन्सल्टेशन चार्ज घ्यावा हे अद्यापही निश्चित करण्यात आलेले नाही. परंतु, मेडीकल कन्सल्टेशन चार्ज घेणाºया वैद्यकीय अधिकाºयाने रुग्णाचे समाधान करणे गरजेचे आहे. मेडीकल कन्सल्टेशन चार्ज आणि इतर विषयाला अनुसरून प्रभावी नियमावली तयार करण्याचा विषय शासनाकडे विचाराधीन आहे.- पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक,वर्धा.शिक्षण जरी सारखे असले तरी एका खासगी डॉक्टर आणि दुसºया खासगी डॉक्टरांच्या मेडीकल कन्सल्टेशन चार्ज मध्ये तफावत आहे. इस्टॅब्लीस्ट कॉस्ट जास्त असल्याने ही तफावत दिसून येते. इतकेच नव्हे तर खासगी रुग्णालयांवर मोठ्या प्रमाणात कर लादण्यात आले आहे. गरीब व गरजू रुग्णांची समस्या लक्षात घेता शासनाने खासगी रुग्णालयांना सवलती दिल्या पाहिजे.- संजय मोगरे, अध्यक्ष, आय. एम. ए., वर्धा.

टॅग्स :docterडॉक्टर