नालवाडी ग्रामपंचायतची विकासाकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 11:17 PM2019-07-07T23:17:23+5:302019-07-07T23:18:19+5:30

ग्रामपंचायत हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. गावाचा विकास होण्यासाठी ग्रामपंचायतपासून विकासाची सर्व चाक व्यवस्थित राहिली पाहिजे. नालवाडी ग्रामपंचायतीने विकासाकडे झेप घेतली आहे, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.

Nalwadi will move towards the development of Gram Panchayat | नालवाडी ग्रामपंचायतची विकासाकडे वाटचाल

नालवाडी ग्रामपंचायतची विकासाकडे वाटचाल

googlenewsNext
ठळक मुद्देरामदास तडस : गुणवंत व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ग्रामपंचायत हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. गावाचा विकास होण्यासाठी ग्रामपंचायतपासून विकासाची सर्व चाक व्यवस्थित राहिली पाहिजे. नालवाडी ग्रामपंचायतीने विकासाकडे झेप घेतली आहे, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.
नालवाडी ग्रा. पं. च्यावतीने रविवारी खा. तडस, आमदार डॉ. पंकज भोयर यांच्यासह दहावी, बारावीतील गुणवंत आणि सेवाव्रतींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे होते. उद्घाटन जि.प. सदस्य नुतन राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपूल जाधव, प.स.सदस्य चंदा सराम, गटविकास अधिकारी स्वाती इसाये, नालवाडीच्या सरपंच प्रतिभा माऊस्कर, उपसरपंच महेश शिरभाते, लोकमतचे जिल्हाप्रतिनिधी अभिनय खोपडे आदी उपस्थित होते. आ. डॉ. पंकज भोयर यांनी नालवाडी ग्रा.पं.च्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. नालवाडी, महाकाळ व पवनार येथील बचत गटाच्या महासंघाला सभागृह उपलब्ध करून द्यायचे आहे. नालवाडीने ग्रा.पं.ने जागा उपलब्ध करून दिल्यास. २१ लक्ष रूपयाचा निधी दिला जाईल असे सांगितले. प्रास्ताविक सरपंच प्रतिभा माऊस्कर, संचालन प्रा.संदीप पेठारे यांनी केले तर आभार सदस्य वैशाली सातपुते यांनी मानले. माजी प.स.सभापती बाळसाहेब माऊस्कर, प्रमोद राऊत, ग्रामविकास अधिकारी प्रमोद बिडवाईक यांच्यासह ग्रा.प.सदस्य व नागरिक उपस्थित होते.

यांचा झाला सत्कार
सिध्दी पडके, मयुरी मडावी, हर्षल सोनवने, ईषा चरडे, मृणाल भगत, राणी द्रवेकर, वेदांती हरणे, प्रणय कोपरकर, चंचल शिंदे, आकाश मिटकरी, हर्षाली वानखेडे, वेदांती कुकडकर, राम मुडे, श्रेयांक हाडेकर, सर्वांग ढोले, मुयरी हाडके, सजल वनकर, सुज्वल देशमुख, चिन्मय अनंत भाकरे या गुणवंतांचा सत्कार झाला. सामाजिक कार्यासाठी तुषार देवढे, झामरे, हेमंत नरहरशेट्टीवार, सारंग चोरे, उत्तम ढोबळे, सुधीर सगणे, महेंद्र शिंदे, सिमरण खान, रिना कावळे, सुरेश दमके, अश्वजीत जामगडे, सुनीता मेहरे-तडस, मंदा मासोदकर, माधुरीदिदी, अनिता शेंडे, लक्ष्मण धनवीन, डॉ.इंदुमती कुकडकर, प्रभाकर पुसदकर, मुरलीधर बेलखोडे, प्रा.मोहन गुजरकर, अभिमन्यू पवार, धर्मराज पाकुजे, मनोहर जळगावकर, संजय कापसे, डॉ.गोपाल पालिवाल, पतजंली योग समितीचे योग प्रशिक्षक, आधारवड समितीचे जेष्ठ नागरिक, अंकुश उचके, प्रा.नवनीत देशमुख, प्रा.किशोर वानखेडे, आशिष गोस्वामी, पुरूषोत्तम टानपे यांचा स्मृतीचिन्ह देवून सत्कार केला.

Web Title: Nalwadi will move towards the development of Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.