मोहनलाल अग्रवाल : सर्वधर्मीय ग्रामजयंतीचा समारोपदेवळी : सर्वांच्या भलाईचा विचार घेवून ज्ञान आणि दानातून कार्यरत राहणाऱ्याची समाजाने प्रत्येक वेळेस दखल घेतली आहे. सर्वांच्या हितात माझे हित आहे. हा हेतूच ग्रामजयंती साजरा करणारा आहे. त्यामुळे परस्परामध्ये बंधूभावाची व एकात्मतेची भावना रूजविणे गरजेचे झाले आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक मोहनलाल अग्रवाल यांनी व्यक्त केले. सर्वधर्मिय ग्रामजयंती समाप्ती कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस उपअधीक्षक रवींद्र किल्लेवार, तुकारामदास घोडे महाराज, शास्त्री सोशल फोरमचे ईमरान राही, अनिल नरेडी, पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांची उपस्थिती होती. संताची शिकवण व त्यांच्या पे्ररणादायी विचारात समाजाची उन्नती आहे. प्रांतवाद व भाषावाद बाजूला सारून सद्भावना रूजविणे गरजेचे झाले आहे, असे मत जिल्हा पोलीस उपअधीक्षक आर. किल्लेवार यांनी व्यक्त केले. सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुलगावचे प्यारेलाल रामटेके यांचा यावेळी शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन दीपक अग्रवाल यांनी तर आभार महेश अग्रवाल यांनी व्यक्त केले. यावेळी प्रा. गणेश मालधुरे, माजी प्राचार्य दयानंद कात्रे, विजय पेटकर, सुरेश तायवाडे, जगदीश गावंडे, विजय पिंपळकर, शाम घोडे, वसंत खोडे, वसंत जगताप, रत्नाकर कल्याणी, येसनखेडे, नेने महाराज आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
सर्वांच्या हितात माझे हित हीच ग्रामजयंती
By admin | Updated: November 16, 2016 00:58 IST