शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोण्याच्या संशयावरून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 23:52 IST

गायीवर जादूटोणा केल्याच्या संशयावरून दोघांनी मिळून एकाची हत्या केल्याची घटना तालुक्यातील परसोडी येथे मंगळवारी उघड झाली. मृतकाचे नाव वासुदेव सूर्यभान नैताम (४५) असे असून या प्रकरणी पोलिसांनी गावातील दोघा भावंडांना ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देपरसोडी येथील घटना : दोघांना घेतले ताब्यात

ऑनलाईन लोकमतसमुद्रपूर : गायीवर जादूटोणा केल्याच्या संशयावरून दोघांनी मिळून एकाची हत्या केल्याची घटना तालुक्यातील परसोडी येथे मंगळवारी उघड झाली. मृतकाचे नाव वासुदेव सूर्यभान नैताम (४५) असे असून या प्रकरणी पोलिसांनी गावातील दोघा भावंडांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी हत्येची कबुली दिली असून प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे मंगेश श्यामराव पेंदाम (२७) व आकाश श्यामराव पेंदाम दोन्ही रा. परसोडी असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघांनी वासुदेवच्या डोळ्यात तिखट टाकून त्याची हत्या केल्याची कबुली दिली.पोलीस सुत्रानुसार, गत काही दिवसांपुर्वी मंगेश व आकाश पेंदाम यांच्या गायीची प्रसूती झाली. याच काळात सदर गाय लंगडी झाली. या गायीवर वासुदेव नैताम याने करणी केल्याचा संशय या दोघांना आला. शिवाय याच कारणावरून या दोन्ही परिवारात वादही झाला होता. तेव्हापासूनच या दोघांनी वासुदेवला संपविण्याचा कट रचला.दरम्यान सोमवारी सायंकाळी वासुदेव त्याच्या शेतात असलेल्या तुरीच्या ढिगाची पाहणी करण्याकरिता जात होता. शेतात एकटाच जात असल्याचे लक्षात येताच आकाश व मंगेश हे दोघे वासुदेव याच्या शेतात जाण्याच्या मार्गावर लपून बसले. वासुदेव जसा समुद्रपूर-परसोडी मार्गावरील पांदण रस्त्यावर आला त्याच वेळी या दोघांनी त्याच्या डोळ्यात तिखट टाकले. यातही वासुदेव सुमारे ८० फुट धावत गेला. येथे पाठलाग करून या दोघांनी त्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.आज सकाळी सदर घटना पोलीस पाटील राजेंद्र मडावी यांना मिळताच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत पाहणी केली. घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळार सापडलेल्या एका काठीच्या आधारावर व घटनास्थळी न आलेल्या एका परिवारावर हत्येचा संशय व्यक्त झाला. दरम्यान श्वान पथकानेही त्याच घराचा रस्ता दाखविल्याने पोलिसांनी मंगेश आणि आकाश पेंदाम या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी हिसका दाखविताच त्यांनी हत्येची कबुली दिली. या प्रकरणी पूर्वी अज्ञात आरोपींविरूद्ध भादंविच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केला. तर आरोपीची ओळख पटल्यानंतर यात कलमांची वाढ होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेचा पुढील तपास समुद्रपूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण मुंडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उमेश हरनखेडे करीत आहेत.मृताच्या शरीरावर २० घावमृत वासुदेव याच्या शरीराचा पोलिसांनी पंचनामा केला असता त्यावर तब्बल २० घाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे घाव कुºहाडीचे असावे असा संशय पोलिसांचा आहे.चार वर्षांपूर्वी पोलिसांनी घेतली होती गावात सभाया गावात जादुटोण्याच्या कारणावरून अनेकवेळा वाद झाले होते. यामुळे सन २०१४ मध्ये या गावात पोलिसांनी जनजागृतीपर सभा घेतली होती. जनजागृतीकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर येथे याच कारणाने हत्या झाल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा