शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात गांजा विक्रेत्याची हत्या; दोन संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 15:50 IST

स्थानिक आनंदनगर येथील गांजा विक्रेता असलेल्या एका इसमाची गुरुवारी धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देआनंदनगरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक आनंदनगर येथील गांजा विक्रेता असलेल्या एका इसमाची गुरुवारी धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मिलिंद सुभाष मेश्राम (४५) असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दोन संशयितांना शहर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.पोलीस सुत्रानुसार, आनंदनगरातील रहिवासी असलेला मृतक मिलिंद हा गांजाची वाहतूक करीत असल्याचे आढळून आल्याने त्याला विशाखापट्टनम येथील पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात त्याने सुमारे १८ महिन्यांचा कारावास नुकताच भोगला होता. त्यानंतर वर्धेत परतलेल्या मृतक मिलिंदने सदर अवैध व्यवसायाला हात जोडत रेल्वे गाड्यांमध्ये चहा विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचे पालन पोषण करण्यास सुरूवात केली होती. दरम्यान अज्ञात व्यक्तीने मिलिंद हा त्याच्या घरी एकटा असल्याचे हेरून कुठल्यातरी कारणाने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या केली. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मिलिंदचा मृतदेह त्याच्या घराशेजारी असलेल्या निर्माणाधीन घराच्या आवारात शौचालयासाठी तयार करण्यात आलेल्या टाक्यात फेकून घटनास्थळावरून पळ काढला. शुक्रवारी सकाळी ही घटना निदर्शनास येताच शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत मदने, पोलीस उपनिरीक्षक बोरखेडे, निलेश खेकारे यांनी आपल्या चमुसह घटनास्थळ गाठले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी मिलिंदचा मृतदेह शौचालयाच्या टाक्याबाहेर काढून पंचनामा करीत मृतदेह तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. सदर प्रकरणी वर्धा शहर पोलिसांनी चौकशीसाठी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यात एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने करीत आहेत.मृतकाच्या शरीरावर ३१ गंभीर जखमाअज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून मिलिंद मेश्राम याची हत्या केली. मृतक मिलिंद याच्या शरीरावर आरोपीने धारदार शस्त्राने चक्क ३१ वार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आहे आहे. इतकेच नव्हे तर आरोपीने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मिलिंदचा मृतदेह शौचालयासाठी तयार करण्यात आलेल्या टाक्यात फेकून दिला.दोन दिवसांपूर्वी मृतक आला होता शहर पोलीस कचेरीतमृतक मिलिंद मेश्राम हा त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला सोबत घेऊन त्याच परिसरातील रहिवासी असलेल्या एका तरुणाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी सुमारे दोन दिवसांपूर्वी आला होता. परंतु, त्यावेळी काही कारणास्तव पोलिसात तक्रार देण्यात आली नाही. त्यानंतर दोघेही घरी परतले. दरम्यान आज मिलिंदचा मृतदेह त्याच्या घराच्या आवारात आढळून आला.अल्पावधीतच घरातील रक्ताचा सडा स्वच्छघटनेच्यावेळी मृतक मिलिंद हा घरात एकटाच होता. याच आनंदनगर परिसरात मध्यरात्री २ वाजेपर्यंत वर्धा शहर पोलिसांची चमू गस्तीवर होती. त्यावेळीपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही; पण सकाळी मिलिंद मेश्राम याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मारेकऱ्याने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मिलिंदचा मृतदेह शौचालयासाठी तयार केलेल्या टाक्यात फेकून दिला. इतक्यावर तो थांबला नाही तर त्याने मृतकावर धारदार शस्त्राने तब्बल ३१ वार केले रक्ताने माखलेले ते घर अल्पावधीतच स्वच्छ करून तेथून पोबारा केल्याचेही पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा