शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 05:00 IST

श्रीकांत भस्मे, कपील भस्मे व त्यांचा एक साथीदार या तिघांनी जुन्या कारणावरून रोहीतशी वाद केला. वाद होत असल्याचे लक्षात येताच कपील भस्मे याच्या आईने मध्यस्ती करून वाद सोडविला. त्यानंतर शुभम जगताप व इतर सर्व तरुण घरी परतले. सायंकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास शुभम जगताप हा घरी असताना रोहीत हा त्याच्या घरी आला.

ठळक मुद्देतिघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात : जुना वाद गेला विकोपाला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/पुलगाव : येथील सुभाषनगरात जुन्या वादाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने तिघांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका तरुणाला जबर मारहाण करून त्याची हत्या केली. ही घटना शनिवारी रात्री उशीरा घडली असून रोहीत मनोज गौनधरे उर्फ डंभारे रा. पुलगाव असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी तीन आरोपींना पुलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.श्रीकांत भस्मे, कपील भस्मे व त्यांचा एक साथीदार या तिघांनी जुन्या कारणावरून रोहीतशी वाद केला. वाद होत असल्याचे लक्षात येताच कपील भस्मे याच्या आईने मध्यस्ती करून वाद सोडविला. त्यानंतर शुभम जगताप व इतर सर्व तरुण घरी परतले. सायंकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास शुभम जगताप हा घरी असताना रोहीत हा त्याच्या घरी आला. त्यानंतर रोहीत आणि शुभम जगताप हे दोघे घराशेजारी गोष्टी करीत असताना तेथे श्रीकांत भस्मे तसेच त्याचे दोन साथीदार हातात शस्त्र घेऊन आलेत. त्यांनी आमच्याशी नेहमी वाद का करतो, असे म्हणत रोहीतला जबर मारहाण केली. वाद सोडविण्यासाठी शुभम जगताप हा गेला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. शुभम जगताप याने आरडा-ओरड केल्यावर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती रोहीतला मृत घोषित केले. तर जखमी शुभम जगताप याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील आरोपी श्रीकांत भस्मे, अनिल भस्मे व या दोघांना साथीदार असलेल्या एका अल्पवयीन व्यक्तीला पुलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मृतावर हाणामारीसह दारूबंदी अन्वये गुन्हे दाखलमृतक रोहीत याच्यावर मागील काही दिवसांपूर्वीच जबर मारहाण केल्या प्रकरणी पुलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. इतकेच नव्हे तर तो छुप्या पद्धतीने अवैध दारूविक्रीचा व्यवसाय करीत असल्याने त्याच्यावर दारूबंदी कायद्यान्वयेही काही गुन्हे दाखल असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.पाईप, विळा, लाकडी दांडा केला जप्तरोहीत व शुभम जगताप याला जबर मारहाण करण्यासाठी आरोपींनी लोखंडी पाईप, विळा तसेच दांड्याचा वापर केला. आरोपींनी मनुष्यवधाच्या या गुन्ह्यात शस्त्र म्हणून वापरलेले हे साहित्य पुलगाव पोलिसांनी जप्त केले आहे.एसडीपीओंनी केली घटनास्थळाची पाहणीहत्येची माहिती मिळताच पुलगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव, पुलगावचे ठाणेदार रवींद्र गायकवाड, सहाय्यक उपनिरीक्षक मुजबैले, विवेक बन्सोड आदींनी घटनास्थळ गाठून परिसराची बारकाईने पाहणी करीत पंचनामा केला. 

टॅग्स :Murderखून