शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
2
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
3
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
4
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
5
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
6
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
7
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले
8
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
9
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
10
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
11
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
12
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
13
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
14
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
15
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
16
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
17
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
18
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
19
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
20
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...

‘होम आयसोलेट’ कोविड बाधिताचा मृत्यू टाळण्यासाठी पालिका ॲक्टिव्ह मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 05:00 IST

आरोग्य विभागाच्या मदतीने वर्धा नगरपालिकेने वर्धा शहरात कोविड चाचण्यांची संख्या वाढविली आहे. त्यामुळे नवीन कोविडबाधित वेळीच ट्रेस होत आहेत, तर कोविड रुग्णालयांवर कामाचा ताण वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने कोविडची सौम्य लक्षणे असलेल्यांसह लक्षणविरहित कोविडबाधिताला गृह अलगीकरणात राहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये न जाता स्वयंघोषणापत्र भरून दिल्यावर अनेक ॲक्टिव्ह कोविडबाधित गृह अलगीकरणाचा पर्याय निवडत आहेत.

ठळक मुद्देराबविली जातेय विशेष मोहीम : गृहभेटी देऊन तपासणार शरिरातील ऑक्सिजन पातळी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सध्या तीन हजारांहून अधिक ॲक्टिव्ह कोविड बाधित आहेत. त्यापैकी अर्ध्याहून अधिक ॲक्टिव्ह कोविडबाधित सध्या होम आयसोलेट असून, याच रुग्णांची ऑक्सिजन पातळी अचानक ढासळून  जिल्ह्यातील कोविड मृतांची संख्या वाढू नये या हेतूला केंद्रस्थानी ठेवून  वर्धा नगरपालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून गृहभेटी देऊन ‘होम आयसोलेट पेशंट’ची ऑक्सिजन पातळी दररोज तपासली जाणार आहे. ज्या व्यक्तीची ऑक्सिजन पातळी खालावल्याचे निदर्शनास येईल त्याला तातडीने कोविड रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात येणार आहे.आरोग्य विभागाच्या मदतीने वर्धा नगरपालिकेने वर्धा शहरात कोविड चाचण्यांची संख्या वाढविली आहे. त्यामुळे नवीन कोविडबाधित वेळीच ट्रेस होत आहेत, तर कोविड रुग्णालयांवर कामाचा ताण वाढू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने कोविडची सौम्य लक्षणे असलेल्यांसह लक्षणविरहित कोविडबाधिताला गृह अलगीकरणात राहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये न जाता स्वयंघोषणापत्र भरून दिल्यावर अनेक ॲक्टिव्ह कोविडबाधित गृह अलगीकरणाचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे सध्या वर्धा शहरासह जिल्ह्यात होम आयसोलेट ॲक्टिव्ह कोविडबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णासह गृह अलगीकरणात असलेल्या प्रत्येक कोविडबाधिताला वेळीच आणि चांगली आरोग्यसेवा मिळाली पाहिजे असा वर्धा जिल्हा प्रशासनाचा हेतू असल्याने याच हेतूला केंद्रस्थानी ठेवून वर्धा नगरपालिकेनेही एक पाऊल पुढे टाकत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नवीन मोहीम हाती घेण्याचे निश्चित करून बुधवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आशा स्वयंसेविकांचे सहकार्य घेतले जाणार असून, त्या गृहभेटी देऊन ‘होम आयसोलेट पेशंट’ची ऑक्सिजन पातळी दररोज तपासणार आहेत. शिवाय त्याबाबतचा अहवाल वर्धा नगरपालिकेला दररोज सादर करणार आहेत.

पल्स ऑक्सिमीटरचे पटवून देणार महत्त्वगृह अलगीकरणात असलेल्या प्रत्येक कोविडबाधिताच्या घरी भेटी देऊन आशा स्वयंसेविका कोविडबाधित व्यक्तीच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासणार आहेत. याचदरम्यान ज्या व्यक्तीची पल्स ऑक्सिमीटर खरेदी करण्याची कुवत आहे त्या व्यक्तीला या यंत्राचे महत्त्व पटवून देत त्याची खरेदी करण्याचा सल्ला देणार आहे. ॲक्टिव्ह कोविडबाधित, तसेच त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांना गृह अलगीकरण कालावधीत घराबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आल्याने रुग्णाला ऑक्सिमीटर खरेदी करण्यासाठी आर्थिक वगळता यथायोग्य सहकार्यही करणार आहेत.

४३ आशास्वयंसेविकांचे घेताहेय सहकार्यवर्धा शहरातील ‘होम आयसोलेट पेशंट’ची ऑक्सिजन पातळी दररोज तपासण्यासाठी वर्धा नगरपालिका तब्बल ४३ आशा स्वयंसेविकांचे सहकार्य घेत आहे. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविकेची दखलही वर्धा नगरपालिका प्रशासन घेणार आहे. कर्तव्य बजावणाऱ्या आशास्वयंसेविकांना पालिकेने मास्क व इतर आवश्यक साहित्याचा पुरवठा केला असून मागणी होताच साहित्य पुरविले जाणार आहे.

पालकमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीदरम्यान जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून वर्धा नगरपालिकेने ४३ आशा स्वयंसेविकांचे सहकार्य घेत वर्धा शहरातील  ‘होम आयसोलेट पेशंट’ची ऑक्सिजन पातळी दररोज तपासण्याची माेहीम डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून हाती घेतली आहे. कुठल्याही ‘होम आयसोलेट पेशंट’चा ऑक्सिजन पातळी ढासळून मृत्यू होऊ नये हा या मोहिमेचा मूळ उद्देश आहे.- विपीन पालिवाल, मुख्याधिकारी, न.प. वर्धा.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या