वर्धा : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने सुरक्षारक्षक, महावितरणमधील कंत्राटी कामगार तसेच आऊटसोर्सिंग कामगारांच्या विविध मागण्याकरिता बोरगाव येथील वीज कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. मंगळवारीदेखील सदर आंदोलन सुरू होते.महापारेषणमधील ५३ सुरक्षारक्षकांची सेवा माथाडी बोर्डाच्या मार्फत नियमित करावी, कंत्राटदार बदलला तरीही जुन्या सुरक्षारक्षकांना कामावर नियमित ठेवावे, महावितरणमधील सहा ते सात वर्षापासून काम करीत असलेल्या कंत्राटी कामगारांना नियमित करावे, गजानन चौधरी यांच्या अपघाताची चौकशी करावी, कंत्राटदारामार्फत त्यांना नुकसान भरपाई मिळावी, आदी मागण्याकरिता हे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. आयटकचे कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, जिल्हाध्यक्ष मनोहर पचारे, झोनल अध्यक्ष सुरेश गोसावी, सचिव एस.एम. मोहदुरे, साहेबराव मुन, भालचंद्र म्हैसकर, चाफले, महल्ले आदींच्या उपस्थितीत उपोषण सुरू झाले.(शहर प्रतिनिधी)
महावितरण सुरक्षा कर्मचाऱ्यांचे उपोषण
By admin | Updated: July 29, 2015 02:09 IST