शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

साहेब वाघ दोनदा येऊन गेला; आता काय आम्ही शेतात जाणे सोडायचे का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 05:00 IST

पेठ येथील शेतकरी अशोक ठोंबरे यांचा मुलगा लतिष  बैलबंडीवर बसून वन्य प्राण्यांपासून बचावासाठी रब्बीतील गहू पिकांची रखवाली करीत होता. रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास अचानक श्वानांच्या भुंकण्याचा आवाज सुरू झाल्याने शेतकऱ्याने टॉर्च मारून बघितले असता गोठ्यात पट्टेदार वाघाने गायीच्या वासरावर हल्ला चढविल्याचे दिसले. ठोंबरे यांनी आरडाओरड करीत पट्टेदार वाघाला शेतातून पळवून लावले. 

लोकमत न्यूज नेटवर्क तारासावंगा : तारासावंगासह परिसरातील वाडेगाव, चीचकुंभ, पेठ माणिकवाडा व जामगाव शेतशिवारात  पट्टेदार व बिबट्या वाघाचा मुक्त संचार सुरू असून तारासावंगा परिसरात वाघाने  २१ फेब्रुवारी रोजी पेठमधील शेतकरी अशोक ठोंबरे यांच्या मालकीच्या वासरावर हल्ला चढवून  जखमी केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे.पेठ येथील शेतकरी अशोक ठोंबरे यांचा मुलगा लतिष  बैलबंडीवर बसून वन्य प्राण्यांपासून बचावासाठी रब्बीतील गहू पिकांची रखवाली करीत होता. रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास अचानक श्वानांच्या भुंकण्याचा आवाज सुरू झाल्याने शेतकऱ्याने टॉर्च मारून बघितले असता गोठ्यात पट्टेदार वाघाने गायीच्या वासरावर हल्ला चढविल्याचे दिसले. ठोंबरे यांनी आरडाओरड करीत पट्टेदार वाघाला शेतातून पळवून लावले. पण, वासरू गंभीर जखमी झाले. याची माहिती वनविभागाला दिली असता अधिकाऱ्यांनी   घटनास्थळ गाठून चौकशी केली. झालेल्या नुकसानीसाठी जखमी झालेल्या वासराच्या औषधोपचाराचे बिल जवळ ठेवा, औषधोपचारासाठी लागलेला खर्च वनविभागाच्या वतीने देण्यात येईल, अशा सूचना दिल्या. मात्र, दुसऱ्या दिवशीही वाघाने त्याच शेतात आल्याने खळबळ उडाली.  घटनेची माहिती वनविभागाला दिली. परंतु वनविभागाने चार ते पाच दिवस तुम्ही घरीच जनावरे बांधा अशी उत्तरे दिल्याने वनविभागही वाघाचा बंदोबस्त करण्यास अपयशी ठरत असेल तर अशात दिवसरात्र रब्बी पिकांच्या रखवालीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी मदत मागायची तरी कुणाकडे? हा प्रश्न निर्माण झाला  असून बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

शेतकरी, मजुरांच्या अडचणीत भर-  सध्या गहू व चणा आदी पिकांची निगा शेतकरी राखत असताना शेत शिवारातही वाघ मुक्त संचार करीत असल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांच्या अडचणीत भर पडली आहे. -  मागील एका महिन्यांपासून अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ले होत आहे. रब्बी पिकांच्या हंगामात वाघाच्या हल्ल्यांच्या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. नुकसानग्रस्त पशुपालकांना शासकीय मदत देत वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

बिबट्याने पाडला  कालवडीचा फडशा

-  सेलू (घोराड) : किन्ही शिवारात असलेल्या प्रदीप रामकृष्ण राऊत यांच्या शेतातील गोठ्याबाहेर बांधून असलेल्या कालवडीवर बिबट्याने हल्ला चढवून तिला ठार मारले. ही घटना गुरुवार २४ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. -  किन्ही जखळा पांदण रस्त्याला लागून असलेल्या राऊत यांच्या शेतासह लगतच्या परिसरात बिबट्याचा वावर आहे. सध्या शेतात रात्रीच्या वेळी शेतकरी जागलीसाठी जात आहेत. अशावेळी बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. 

 

टॅग्स :Tigerवाघ