शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

निवडणुकीच्या तोंडावर एमपी बनावटीची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 06:00 IST

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सेवाग्राम रेल्वेस्थानक टी-पॉइंटजवळ नाकाबंदी करीत छापा घालून सदानंद संतोष कंजरभाट व प्रकाश बोरसरे या दोघांना ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान त्यांच्याकडून ७५० मि. लि. चे मध्य प्रदेश बनावटीचे बॉम्बे स्पेशल व्हिस्कीचे बंपर किंमत ३५ हजार ६२० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देदोघे अटकेत : शहर ठाण्याच्या डीबी पथकाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निवडणुकीच्या तोंडावर मध्य प्रदेशातून वर्ध्यात अवैधरीत्या दाखल झालेला दारूसाठा जप्त केला. या साठ्याची किंमत ३५ हजार ६२० रुपये आहे. शहर ठाण्याच्या (डीबी) गुन्हे प्रगटीकरण पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली.सदानंद संतोष कंजरभाट वय २१ रा. इतवारा बाजार, वर्धा, प्रकाश नामदेव बोरसरे वय ३५ रा. शनी मंदिरामागे, सालोड (हिरापूर), वर्धा अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सेवाग्राम रेल्वेस्थानक टी-पॉइंटजवळ नाकाबंदी करीत छापा घालून सदानंद संतोष कंजरभाट व प्रकाश बोरसरे या दोघांना ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान त्यांच्याकडून ७५० मि. लि. चे मध्य प्रदेश बनावटीचे बॉम्बे स्पेशल व्हिस्कीचे बंपर किंमत ३५ हजार ६२० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हा दारूसाठा मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथून रेल्वेगाडीद्वारे वर्ध्यात आणला जात होता, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे व उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक योगेश पारधी व गुन्हे प्रगटीकरण पथकाचे सहायक फौजदार दत्तात्रय ठोंबरे, नायक पोलिस शिपाई सचिन इंगोले, सचिन धुर्वे, पोलिस शिपाई दिनेश राठोड आदींनी केली. कारवाईमुळे दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.दारूविक्रेते लढविताहेत शक्कलविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमांवर पोलिस विभागाच्यावतीने तब्बल २० चेकपोस्ट लावण्यात आले आहेत. त्यामुळे दारू वाहतुकीला लगाम लागल्याने दारूविक्रेत्यांकडून नानाविध शक्कल लढविल्या जात आहेत. दारू वाहतुकीकरिता एसटी बस, खासगी ट्रॅव्हल्स एवढेच नव्हे, तर रेल्वेगाडीचाही वापर केला जात आहे. पोलिस विभागाने एसटी महामंडळाच्या बसेस, रेल्वेगाडी, खासगी वाहनांची कसून तपासणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी