शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात लक्षणे नसलेले कोरोना रुग्ण सर्वाधिक; आयसीयुतील रुग्ण खाटा फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 07:00 IST

सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या आयसीयुतील रुग्णखाटा दिवसेंदिवस झपाट्याने भरल्या जात आहे.

ठळक मुद्दे४०० कोविड बाधितांवर दोन कोरोना रुग्णालयांमध्ये होताहेत उपचार

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. अशातच वर्धेकरांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या आयसीयुतील रुग्णखाटा दिवसेंदिवस झपाट्याने भरल्या जात आहे. सध्यास्थितीत या दोन्ही कोविड रुग्णालात एकूण ४०० कोरोना बाधित उपचार घेत असून यात निम्म्या पेक्षा अधिक रुग्ण लक्षणविरहित आहेत. असे असले तरी झपाट्याने कोरोना वाढत असल्याने वर्धेकरांनीही आता गाफिल न राहता दक्ष राहून स्वत:ची आणि स्वत:च्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे.

प्राप्त माहितीनुसार, सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात सध्या २१२ कोविड बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी २७ रुग्ण गंभीर असून २२ रुग्णांमध्ये कोरोनाची किरकोळ लक्षणे आहेत. तर १६८ कोविड बाधित लक्षणविरहित असल्याचे सांगण्यात आले. तर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात सध्यास्थितीत १८८ कोविड बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ३८ रुग्ण गंभीर असून १९ कोरोना बाधितांना किरकोळ लक्षणे आहेत. तसेच १३१ कोविड बाधित लक्षणविरहित आहेत.

या सर्व कोविड बाधितांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी विशेष प्रयत्न करीत आहेत. असे असले तरी वर्धेकरांनी कोरोना संकटात आपली जबाबदारी वेळीच ओळखून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन काटेकोरपणे करणे ही काळाची गरज ठरू पाहत आहे.

लक्षणविरहीत रुग्णांमुळे डॉक्टरांवर वाढला ताणअ‍ॅक्टिव्ह कोविड बाधितांपैकी निम्म्यापेक्षा जास्त कोविड बाधित लक्षणविरहित आहेत. अशा लक्षणविरहित रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. पण त्या निर्णयावर प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने सध्या कोविड योद्धा म्हणून काम करणाºया वैद्यकीय अधिकाºयांवर गंभीर व किरकोळ कोविड बाधित रुग्णांवर उपचार करताना कामाचा मोठा ताण येत असल्याचे वैद्यकीय अधिकाºयांकडून सांगण्यात आले.सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील कोविड रुग्णालयाच्या आयसीयुमध्ये रुग्णखाटांचा तुटवडा आहे ही बाब खरी आहे. असे असले तरी जिल्ह्याची कोरोना स्थिती सध्या नियंत्रणात आहे. वर्धेकरांनी गाफिल राहिल्यास कोरोनाचा प्रसार आणखी झपाट्याने होईल. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.- डॉ. अनुपम हिवलेकर, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस