शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
3
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
4
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
6
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
7
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
8
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
9
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
10
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
11
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
12
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
13
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
14
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
15
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
16
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
17
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
18
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
19
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
20
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन

वर्धा जिल्ह्यातील पावसामुळे सात हजारांहून जादा घरांची पडझड, आर्थिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 20:10 IST

Wardha : यावर्षी दोन महिन्यात ४ हजार ३१२ हेक्टर क्षेत्रवरील पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हवामान बदलत चालले आहे. कधी अवकाळी पावसाचा फटका, तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पावसाळमुळे सन २०२१ पासून आतापर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील ७ हजार ७७५ घरांची पडझड झाली, तर १३० घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात १२ नद्या व अनेक नाले पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीनंतर तुडुंब वाहून आजूबाजूच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण करतात. जिल्ह्यात मुख्यत्वे मान्सूनमध्ये पूर येतो. थोड्या जलमार्गावर अतिक्रमण, अपुरी ड्रेनेज कालावधीत येणाऱ्या अतिवृष्टीमुळे, क्षमता, नाल्यांची देखरेख न करणे, यामुळे पूरस्थिती ओढवते. तसेच अलीकडे मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली आहे. यामुळे अनेक रस्ते, नाल्या खोदून ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. सोबतच जिल्ह्यातील काही नागरिकांचे अजूनही मातीचे घर आहेत. यामुळे संततधार पावसामुळे या घरांना अधिक धोका निर्माण होत असतो. सन २०२१ पासून आजपावतो या कालावधीत तब्बल ७ हजार ७७५ घरांची पडझड झाली आहे, तर १३० घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. शासनस्तरावरून त्यांना मदत देण्यात आली आहे, तर यावर्षी जून आणि जुलै महिन्यांत झालेल्या घरांची पडझडाची नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

दोन महिन्यांत ४ गोठ्यांचे झाले नुकसानसन २०२५ मध्ये जून व जुलै या दोन महिन्यांत जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे एकूण ४ गोठ्यांचे नुकसान झाले आहे.

४ हजार ३१२ हेक्टरवरील पिकांचे नुकसानयावर्षी जूनच्या शेवटी व जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, अतिवृष्टीमुळे जून महिन्यातील पावसामुळे ७१६ हेक्टर व जुलै महिन्यात ३ हजार ५९६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले.

२८१ पशुंची झाली हानीजिल्ह्यात सन २०२१ पासून ते सन २०२५ च्या जुलै महिन्यापर्यंत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे लहान पशू ९३, तर मोठे पशू १८८, असे एकूण २८१ पशुंची हानी झालेली आहे.

जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले वार्षिक नुकसानहानीचा प्रकार                २०२५            २०२४           २०२३           २०२२            २०२१मनुष्य हानी मृत               ०२                 १०               ०८               २१                १२जखमी                            ००                 ०५              १०                १०               ०५घरांचे नुकसान अंशतः    १६४             १०८५           ६२१             ५२३३            ६०२पूर्णतः                             ००                ०३              ३५               ८०                १३पशूधन हानी लहान         ०३                 ०८             १४                ५७               ११मोठी                              ०४                ४४              ३३               ७८               २९

टॅग्स :wardha-acवर्धाfloodपूर