शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पैसे थकले; अडत्यांकडून खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:18 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या मालाचे अडत्यांचे कोट्यवधी रुपये व्यापाऱ्यांनी थकविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चुकारा कसा द्यायचा, असा प्रश्न अडत्यांना पडल्याने ते आक्रमक झाले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांपुढे प्रश्नच : उपसभापतींच्या कक्षात अडत्यांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या मालाचे अडत्यांचे कोट्यवधी रुपये व्यापाऱ्यांनी थकविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चुकारा कसा द्यायचा, असा प्रश्न अडत्यांना पडल्याने ते आक्रमक झाले. या संदर्भात बाजार समितीच्या उपसभापती यांच्या कक्षात झालेल्या बैठकीत जोपर्यंत व्यापाऱ्यांकडून पैसे मिळणार नाही तो पर्यंत उद्यापासून खरेदी बंद करण्याचा इशारा अडत्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे अडत्यांनी सभापतींच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा अडत्यांना आक्रमक होण्याची वेळ आल्याची चर्चा परिसरात होती.बाजार समितीत सोयाबीन, तूर, चणा व गहू आदी शेतमाल शेतकरी विक्रीसाठी आणतांना दिसत आहे. ही आवक दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी सकाळी अनेक शेतकºयांनी आपला शेतमाल बाजार समितीत विक्रीकरिता आणला होता. अडत्यांची सदर आक्रमक भूमिकेची माहिती मिळाल्यानंतर सभापतींच्या सूचनांवरून शेतकऱ्यांकडून त्यांचा शेतमाल खरेदी करण्यात आला. परंतु, अडत्यांच्या माध्यमातून होणारी खरेदी थांबली होती. व्यापाऱ्यांनी मागील सहा महिन्यांपासून अडत्यांचे जवळपास कोट्यवधी रुपये थकविल्याने मंगळवारी खरेदी केलेल्या शेतमालाचे शेतकऱ्यांना चुकारे देण्यासाठी अडत्यांना अडचण निर्माण झाली. बाजार समितीत असलेले शेतमालाची आवक आणि शेतकºयांना चुकारे देण्यासाठी अडत्यांकडे असलेली पैशाची कोरड यामुळे संतप्त झालेल्या अडत्यांनी खरेदी थांबवून उपसभापती पांडूरंग देशमुख यांचा कक्ष गाठला. येथे अडते व अधिकारी यांच्यात चांगलीच चर्चा रंगली होती. बाजार समिती प्रशासनाने यावर तोडगा न काढल्यास बुधवारपासून खरेदी बंद करण्याचा इशारा अडत्यांनी दिला आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड