शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

घरकुल लाभार्थ्यांचा पैसा अडलाय म्हाडाच्या तिजोरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 05:00 IST

देवळी नगरपालिका क्षेत्रातील ८२४ घरकुल लाभार्थ्यांना या पैशांमधून पावणेबारा कोटी रुपये घ्यावयाचे असल्याचे सर्वांच्या नजरा राज्य शासनाकडे लागल्या आहेत. कोरोना महामारीच्या नियोजनासाठी या पैशांची विल्हेवाट लागली असल्याने पैसे मिळण्यासाठी विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान आवास योजना मंजूर झाल्यापासून केंद्र व राज्य शासनाच्या तुघलकी धोरणामुळे लाभार्थ्यांची फरपट होत आहे.

ठळक मुद्देपावसाळ्यात संसार आला उघड्यावर

हरिदास ढोकलोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून मिळालेला ३०२ कोटींचा वाटा गेल्या तीन महिन्यांपासून राज्य शासनाच्या म्हाडाच्या तिजोरीत अडकून पडला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या कामाला ब्रेक लागला असून, पावसाळ्याच्या दिवसांत पैशांअभावी लाभार्थ्यांना उघड्यावरच दिवस काढावे लागत आहेत. देवळी नगरपालिका क्षेत्रातील ८२४ घरकुल लाभार्थ्यांना या पैशांमधून पावणेबारा कोटी रुपये घ्यावयाचे असल्याचे सर्वांच्या नजरा राज्य शासनाकडे लागल्या आहेत. कोरोना महामारीच्या नियोजनासाठी या पैशांची विल्हेवाट लागली असल्याने पैसे मिळण्यासाठी विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान आवास योजना मंजूर झाल्यापासून केंद्र व राज्य शासनाच्या तुघलकी धोरणामुळे लाभार्थ्यांची फरपट होत आहे. ही योजना केंद्राच्या ६० टक्के व राज्यच्या ४० टक्के वाट्यातून पूर्णत्वास न्यायची होती; परंतु पैशाच्या अडचणीमुळे ही योजना साडेतीन वर्षांपर्यंत बारगळली. देवळी नगरपालिकेच्या क्षेत्रातील लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून ६० टक्क्यांचा वाटा १२ कोटी ३० लाख व राज्य शासनाकडून ४० टक्के वाटा ८ कोटी २० लाख घ्यावयाचा होता. यापैकी राज्य शासनाचा पूर्ण वाटा तीन टप्प्यांत देऊन कामाला गती देण्यात आली होती; परंतु केंद्राने फक्त ९० लाखांचा पहिला हप्ता दिल्याने उर्वरित पैशासाठी काम थांबले. यावर तीन पावसाळे जाऊनसुद्धा केंद्राचा पैसा मिळत नसल्याने अनेकांनी आडोशाला आसरा घेतला आहे, तर काहींनी किरायाच्या घरात संसार थाटला. अशातच तीन महिन्यांपूर्वी मार्चमध्ये केंद्र शासनाने राज्यातील घरकुल लाभार्थ्यांचा ३०२ कोटींचा थकीत वाटा म्हाडाकडे वळता केला. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांचे हे पैसे ३१ मार्चपर्यंत मिळणे अपेक्षित असताना आजपर्यंत मिळाले नाहीत.  

घराचे स्वप्न अधांतरीच- घराचे स्वप्न साकार होणार, या अपेक्षेने लाभार्थ्यांनी राहते घर पाडून इतरत्र आसरा घेतला. थोडीफार गाठीशी असलेली जमापुंजी, नातेवाइकांकडून उसनवारी आणि वेळप्रसंगी कर्जाऊ रक्कम घेऊन घर पूर्णत्वास नेले. मात्र, अद्यापही शासनाकडून लाभार्थ्यांना पैसे मिळाले नसल्याने घरकुलाच्या लोभात अनेकांना कर्जबाजारी व्हावे लागले, तर काहींना पैशाअभावी आहे त्याच अवस्थेत दिवस काढावे लागत आहेत. अनेकांचे अर्धवट झालेले बांधकाम आता मोडकळीसही आले आहे. पावसाळ्यात दिवस कसे काढावेत, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ घरकुलाचे पैसे द्यावेत, अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना