शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यातील मोदींच्या सभेचे मैदान ‘मोकळे’च!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 05:57 IST

मुंबई : भाजप-शिवसेना युतीच्या प्रचारार्थ वर्धा येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे मैदान मोकळेच होते, अशी टीका काँग्रेस ...

मुंबई : भाजप-शिवसेना युतीच्या प्रचारार्थ वर्धा येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे मैदान मोकळेच होते, अशी टीका काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. तर भर उन्हात शरद पवार यांनी पाच हजाराची सभा घेऊ दाखवावी, असे आव्हान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे.

वर्धा येथील मोदींच्या सभेला गर्दीच नव्हती. अर्ध्या खुर्च्या रिकाम्या होत्या. मात्र तरीही मोदींनी सभेला विराट संबोधून जनतेला एप्रिल फूल केले. भाजप सरकारचा कारभार हेही एप्रिलफूल असून गेली पाच वर्षे जनतेला केवळ भूलथापा दिल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, सभेला गर्दी नसल्याचे पाहून हिरमोड झालेल्या मोदींनी शरद पवार यांच्यावर टीका करून आपला त्रागा व्यक्त केला. मोदींच्या जुमले बाजीला जनता कंटाळली असल्याने त्यांनी सभेकडे पाठ फिरवली, अशी टीका त्यांनी केली.

पंतप्रधान मोदी यांच्या वर्धा येथील सभेला गर्दी नसल्याची टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही केली आहे. भाजपने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ४४ अंश तापमानात पाच हजार माणसांची सभा घेऊन दाखवावी असे आव्हान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. पळ काढणारे चौकीदार असतात या अशोक चव्हाण यांच्या टीकेला उत्तर देताना, आदर्शसारखा घोटाळा करुन दरोडा टाकणाऱ्यांना पंतप्रधानांना चोर म्हणताना काही वाटत नाही का? असा सवाल केला.‘हे सरकार घट्ट आहे’गुळाच्या ढेपेच्या मुंगळ्याप्रमाणे मुख्यमंत्री सत्तेला चिकटून बसले आहेत, असे बोलणाऱ्या छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर देताना तावडे म्हणाले की, महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे सरकार हे पूर्ण बहुमताचे सरकार आहे व हे सरकार घट्ट आहे. त्यामुळे आम्हाला सत्तेला चिकटून राहण्याची गरज नाही. जनतेनेच आमच्यावर संपूर्ण विश्वास टाकल्यामुळे आम्ही महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करत आहोत. 

टॅग्स :wardha-pcवर्धाNarendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक