शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

आमदारांनी बोगस कामगंध सापळे पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 22:57 IST

जिल्ह्यात यंदाही बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना कामगंध सापळे लावण्याचे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देपंकज भोयर यांची शिवारभेट : कंपनीला विक्रीबंदचे निर्देश देणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात यंदाही बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना कामगंध सापळे लावण्याचे आवाहन केले आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांनी शिवारभेटीदरम्यान सेलू तालुक्यातील मोही येथील शेतकऱ्यांच्या शेतात भेट देऊन कामगंध सापळ्याची पाहणी केली असता त्यातील फोलपणा उघड झाला व हे सापळे बोगस असल्याचे आमदारांच्या निदर्शनास आले. याची विक्री थांबविण्याचा सूचना त्यांनी दिल्या.आमदार डॉ. पंकज भोयर यांनी बोंडअळींची सद्यास्थिती काय आहे. हे पाहण्यासाठी शेतावर प्रत्यक्ष भेट दिली. त्यावेळी मोही येथील शेतकरी राजेंद्र जाधव यांच्या कपाशीच्या शेतात राजेंद्र जाधव यांच्या कपाशीच्या शेतात लावलेले कामगंध सापळ्याचे निरीक्षण केले. सापळ्यात एकदही नरतपंग आढळला नाही. तर कपाशीच्या बोंडावर पांढरी व गुलाबी या दोन्ही प्रकारच्या बोंडअळ्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्या. शेतात लावलेल्या कामगंध सापळ्यातील बोंडअळीच्या मादीच्या वासाचे कृत्रिम गंध असलेले लुयर कॅप्सूल बोगस असल्याची शंका आमदार भोयर यांनी व्यक्त केली. कृषी अधिकाऱ्यांनी या शेतावर पाठवून सत्य परिस्थितीचे निरीक्षण करण्यास सांगणार आहे. या शेतात लावलेले कामगंध सापळे प्रभावहीन असतील तर ज्या कंपनी हे तयार केले त्याच्या विक्रीवर तात्काळ बंदी आणली जाईल, असे शिवारातील शेतकºयांना आमदारांनी आश्वासन दिले. कामगंध सापळ्यातील मु्ख्य काम त्यामधील लाल रंगाच्या लुयर कॅप्सूलच असते. त्याला मादी बोंडअळीचा कृत्रिम गंध दिला असून नरपतंग त्यामध्ये अडकून प्रजजन प्रक्रियेला खीळ बसते व बोंड निरोगी राहण्यास मदत होते. कंपन्या अधिक नफा कमविण्यसासाठी शेतकºयांच्या माथी बोगस सापळे मारत आहे. कामगंध सापळ्यांचा दर्जा तपासून ते बोगस आढळल्यास कंपन्यांवर कारवाई करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शिवारभेटीदरम्यान, पंचायत समिती सदस्य अशोक मुडे, जि.प. सभापती सोनाली कलोडे, विलास वरटकर, अनिल शिंदे, संदीप चव्हाण, विजय खोडे, वसंत भांदककर व शेतकरी उपस्थित होते.बोगस सापळ्यांची जिल्हाभरात तक्रारकृषी केंद्र विक्रेत्यांकडून तसेच बाजार समित्यांमधून शेतकऱ्यांना सापळ्यांचे वितरण करण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाने सांगितल्यानुसार सापळे एकराप्रमाणे आपल्या शेतात लावले. मात्र या सापळ्यांमध्ये पतंग सापडतच नाही, अशा तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी केल्या आहे. बाजारात असलेले बहुतांश सापळे बोगस असल्याची शक्यता आहे.