लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेलू तालुक्यातील वडगाव (जंगली) या गावामध्ये दारुविक्रेत्यांचा चांगलाच धुमाकूळ असून सेलू पोलिसांकडे वारंवार तक्रार करण्यात आली. मात्र पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने दारुविक्रे त्यांची हिंमत चांगलीच वाढली आहे. दारुबंदी महिला मंडळाच्या सदस्यांना धमकाविणे, अंगावर चाल करुन जाणे, असे प्रकार वाढल्यामुळे महिलांनी आज आमदार डॉ. पंकज भोयर यांची भेट घेऊन आपबिती सांगितली. त्यामुळे आमदारांनी महिलामंडळांसह पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांना निवेदन देत दारुविक्रेत्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.वडगावात मोठ्या प्रमाणात दारुविक्री होत असल्याने गावातील शांतता धोक्यात आली आली आहे. गावातील काही युवकही दारुच्या आहारी जात असल्याने अनेक संसार उघड्यावर येण्याची शक्यता बळावली आहे. दारुविक्रेत्याना रोखण्याचा प्रयत्न केला तर ते जिवे मारण्याच्या धमक्या देतात. कोणालाही निवेदन द्या, तक्रार द्या, आमचे कोणीही काहीही बिघडवू शकत नाही. असे छातीठोकपणे दारुविक्रेते सांगतात. त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले तर तास-दोन तासात पोलीस त्यांना सोडून देतात. सेलूच्या ठाणेदारांना निवेदन व तक्रार दिली तर केवळ आश्वासनच मिळतात पण; कारवाई होत नाही.जमादाराला सांगितले तर माझ्याकडे पंधरा गावाचा कारभार असल्याने कुठे-कुठे लक्ष देऊ, असे उत्तर मिळतात. त्यामुळे आम्ही कुणाकडे न्याय मागावा असा प्रश्न महिलांनी निवेदनातून उपस्थित केला आहे. ही समस्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असल्याने यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी जगताप यांनाही निवेदन देण्यात आले.डिसेंबरमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलो असता पोलीस अधीक्षक नसल्याचे सांगून प्रवेशव्दारावरुनच परत पाठविण्यात आल्याचे महिलांनी यावेळी सांगितले. अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांना निवेदन देताना आ. डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत सरपंच माधुरी सिराम यांच्यासह दारुबंदीच्या महिला मंडळाच्या सदस्यांची उपस्थिती होती.शहरातील अवैध धंद्याला आळा घालावर्धा शहरात सद्यस्थितीत अवैधधंदे जोरात आहे. शहरातील बारा ठिकाणी गांजाचा धूर निघत असल्याच्या तक्रारी आहे. यामध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असून याला तत्काळ आळा घालावा, अशी मागणी आमदार डॉ.पंकज भोयर यांनी अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्याकडे केली असून आमदारांनी शहरातील ठिकाणही त्यांना अवगत करुन दिले. त्यामुळे आता पोलिसांकडून काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दारुबंदीसाठी महिलांसह आमदार आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 06:00 IST
वडगावात मोठ्या प्रमाणात दारुविक्री होत असल्याने गावातील शांतता धोक्यात आली आली आहे. गावातील काही युवकही दारुच्या आहारी जात असल्याने अनेक संसार उघड्यावर येण्याची शक्यता बळावली आहे. दारुविक्रेत्याना रोखण्याचा प्रयत्न केला तर ते जिवे मारण्याच्या धमक्या देतात. कोणालाही निवेदन द्या, तक्रार द्या, आमचे कोणीही काहीही बिघडवू शकत नाही.
दारुबंदीसाठी महिलांसह आमदार आक्रमक
ठळक मुद्देमांडली व्यथा : वडगावच्या दारुविके्रत्यांना सेलू पोलिसांचे अभय