मिटकॉन कन्सल्टन्सी अॅण्ड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि.इन्स्टिट्यूटच्या ५४ विद्यार्थ्यांनी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या बुटीबोरीस्थित अत्याधुनिक मुद्रण प्रकल्पाला भेट दिली. दरम्यान, विद्यार्थ्यांनी लोकमतची छपाई व परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्पाची कार्यप्रणाली अगदी जवळून पाहिली. मंगळवारी प्रकाशित होणाऱ्या ‘सखी’ पुरवणीची छपाईही यावेळी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिली. लोकमतच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना छपाईसाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाची व सौर ऊर्जा प्रकल्पाची विस्तृत माहिती दिली. विद्यार्थ्यांसोबत प्राध्यापक उपस्थित होते.
मिटकॉन कन्सल्टन्सी अॅण्ड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि. इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची लोकमत मुद्रण प्रकल्पाला भेट
By admin | Updated: February 28, 2017 01:16 IST