शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता युवकाची गळफास घेत आत्महत्या; झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

By चैतन्य जोशी | Updated: September 5, 2022 17:54 IST

पाच दिवसांपासून होते शोधात : सम्राटनगर परिसरातील घटना

वर्धा : पाच दिवसांपासून घरातून बेपत्ता असलेल्या युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती सोमवारी ५ रोजी सकाळच्या सुमारास उजेडात आली. ही घटना हिंदीविश्व विद्यालयाच्या पडीक जागेवर सम्राटनगर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.

अमन काळसर्पे (२१) रा. बालाघाट ह.मु. वर्धा असे मृतक युवकाचे नाव आहे. मृतक अमन हा मजुरीचे काम करीत होता. तो ३१ ऑगस्ट रोजीपासून घरातून बेपत्ता होता. त्याच्या नातलगांनी याबाबत रामनगर पोलिसात २ राेजी मिसिंग तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून त्याचा शोध पोलीस घेत होते. मात्र, सोमवारी ५ रोजी शेळ्या चारण्यास गेलेल्या व्यक्तीला दुर्गंधी आल्याने त्याने पडीक जागेची पाहणी केली असता एका युवकाचा मृतदेह झाडाला दोरीने बांधलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याने तत्काळ याबाबतची तक्रार रामनगर पोलिसांना दिली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चन्नोर यांनी कर्मचाऱ्यांना घेत घटनास्थळ गाठून झाडाला लटकलेला मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविला. तो मृतदेह अमन काळसर्पे याचाच असल्याची ओळख पटल्याने मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. मृतक अमनची मानसिक स्थिती काही दिवसांपासून बिघडल्याने त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज रामनगर पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूwardha-acवर्धा