वर्धा : ‘पुनर्वसनाचे नाव दिले; समस्यांचे गाव दिले’ या शिर्षकाखाली ‘लोकमत’ने नटाळा गावाच्या पुनर्वसनाचे गौडबंगाल बुधवारी चव्ह्याट्यावर आणताच या गावाचे परस्पर हस्तांतरण करणारा लघू पाटबंधारे विभाग पुरता हादरला. या विभागाची आता सावरासावर सुरू झाल्याची माहिती आहे.‘लोकमत’वृत्ताची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयानेही पुनर्वसन अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत. तसेच जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनीही वर्धा पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. बुधवारी दिवसभर संबंधित विभागातील सदर प्रकरणाच्या फाईल्स एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर सरकल्याची माहिती आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता नागपूर हिवाळी अधिवेशनामुळे संपर्क होऊ शकला नाही.(जिल्हा प्रतिनिधी)
लघू पाटबंधारे विभाग हादरला
By admin | Updated: December 10, 2014 23:02 IST