शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईच्या काळात मिनरल वॉटरचा धंदा फोफावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:24 IST

जिल्ह्यात अल्प पर्जन्यमानामुळे पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. अनेक ठिकाणी पाच ते सात दिवसानंतर पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरीक पिण्यासाठी पाणी (मिनरल वॉटर) विकत घेत आहे. त्यामुळे शहरात मिनरल वॉटरच्या नावावर पाणी विकणाऱ्यांचे उदंड पीक आले आहे.

ठळक मुद्देशुद्धतेवरही प्रश्नचिन्ह : पाण्याच्या किंमतीत भरमसाठ वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमानामुळे पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. अनेक ठिकाणी पाच ते सात दिवसानंतर पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरीक पिण्यासाठी पाणी (मिनरल वॉटर) विकत घेत आहे. त्यामुळे शहरात मिनरल वॉटरच्या नावावर पाणी विकणाऱ्यांचे उदंड पीक आले आहे. पहाटेपासूनच पाण्याचे कॅन भरलेले आॅटो शहरात व ग्रामीण भागात फिरताना दिसून येत आहे. एकट्या वर्धा शहर व परिसरातील ११ गावांमध्ये पाचशेवर अधिक मिनरल वॉटर विकणारे दुकानदारी थाटून आहेत. यातील अनेकांकडे अन्न औषध प्रशासनाकडून परवानाही नाही. नागरिकांना विहिरी व बोरवेलचे पाणी काढून थंड करून ते विकण्याचा गोरस धंदा जोरात सुरू आहे. पुर्वी साधारणत: १५ ते २० रूपयाला विकली जाणारी पाण्याची कॅन आज ३० ते ४० रूपयावर गेली आहे. घ्यायची असेल तर घ्या, असा दम ग्राहकांना दिला जात आहे. घरपोच पाणी पुरवठ्याचा हा धंदा ग्रामीण भागातही जोरात आहे.कुणाचेही नियंत्रण नाहीमिनरल वॉटर विकणाऱ्या कंपनीत मनुष्यबळाचा वापरच केला जात नाही. आॅटोमेशन मशीनद्वारे आपोआप पाणी शुध्द करून ते कॅनमध्ये भरले जाते. यात मनुष्याचे हात, डोके आदीचे केस पडणार नाही, याची दक्षता घ्यावी लागते. तसेच अन्न, औषध प्रशासनाकडून पाण्याचे नमूने वारंवार तपासून घ्यावे लागतात. त्यांची परवानगी हा व्यवसाय उघडण्यासाठी घ्यावी लागते. मात्र वर्धा शहरात या सर्व निकषाचे पालन करणारे मोजकेच पाणी विक्री करणारे आहे. बाकी इतरत्र सर्वत्र मिळेल ते पाणी ग्राहकांना थंड करून विकण्याचा धंदा सुरू आहे. यावर जिल्हा प्रशासनासह अन्न औषध प्रशासनाचेही नियंत्रण राहिलेले नाही.पाणी विक्रेत्यांनी परिसर घेतले वाटूनया मिनरल वॉटर विकणाऱ्या विक्रेत्यांनी आपआपले परिसर वाटून घेतले आहे. त्यामुळे इतरांच्या भागात दुसरे विक्रेते जात नाही. ग्राहकांना नाईलाजास्तव महागाचे पाणी खरेदी करावेच लागते. या कामासाठी ठेवण्यात आलेले तरूण नवे ग्राहक शोधण्याचे काम करीत असतात. काहींची तर पाणी फॅक्टरी त्यांच्या इतर व्यवसायाच्याच दुकानात थाटण्यात आली आहे. तेथूनच पाण्याचा पुरवठा केला जातो. ग्रामपंचायत प्रशासनाकडेही अशा व्यवसायिकांच्या नोंदी नाही.

टॅग्स :Mineral Waterमिनरल वॉटरwater shortageपाणीटंचाई