शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट बांधकामामुळे प्रवासी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:26 IST

येथे अद्ययावत बसस्थानक निर्मितीसाठी तीन कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी भूमिपुजनाचा सोपसकार पूर्ण झाला. त्यानंतर प्रत्यक्ष कामही सुरू झाले.

ठळक मुद्देबसस्थानकाची दैना : भूमिपूजनाला झाले तीन महिने

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : येथे अद्ययावत बसस्थानक निर्मितीसाठी तीन कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी भूमिपुजनाचा सोपसकार पूर्ण झाला. त्यानंतर प्रत्यक्ष कामही सुरू झाले. परंतु, हे काम कासवगतीनेच होत असल्याने शिवाय प्रवाशांसाठी पर्यायी निवाऱ्याची व्यवस्था न करण्यात येताच जुनी इमारत जमिनदोस्त करण्यात आल्याने सध्या प्रवाशांना झाडांचा आधार घ्यावा लागत आहे. याचा सर्वाधिक त्रास महिलांसह विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.गत ९ एप्रिलला मोठा गाजावाजा करून देवळीच्या नवीन बसस्थानकाचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. ३ कोटींच्या निधीतून अद्यायवत व आधुनिक बसस्थानक तयार होईल, असे यावेळी सांगण्यात आले होते. शिवाय येत्या दोन-चार दिवसात नव्या बस स्थानकाचे बांधकामही सुरू करण्यात येईल, असे सांगितले होते. परंतु, प्रत्यक्ष कृती करण्याकडे पाठच दाखविण्यात आली. कंत्राटदाराने बसस्थानकाची जुनी इमारत जमिनदोस्त केली. त्यामुळे सध्या पावसापासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांसह प्रवाशांना परिसरातील चहा टपरींचा आधार घ्यावा लागत आहे. प्रवाशांची समस्या लक्षात घेता पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. परंतु, दहा बाय दहाचे एक प्लास्टिक टाकून तात्पूर्ता निवारा तयार करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर सदर बस स्थानकात पावसाचे पाणी साचून राहत असून तेथे चिखल तयार झाला आहे. प्रवाशांना चिखल तुडवतच बस मध्ये चढावे लागत आहे. सदर प्रकाराकडे रापमच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.साधी वीट ठेवण्यासाठीही मुहूर्ताचा शोध?भुमिपूजन होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला. परंतु, नवीन बसस्थानकाच्या निर्मितीसाठी आतापर्यंत साधी एक वीटही ठेवण्यात आली नाही. त्यातच सध्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. साधी वीट ठेवण्यासाठी रापमचे अधिकारी व कंत्राटदार कुठला मुहूर्त तर शोधत नाही ना, असा प्रश्न सध्या संतप्त प्रवासी उपस्थित करीत आहेत. त्यामुळे रापमच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याच्या सुचना द्याव्या, अशी मागणी आहे.नवीन बसस्थानकात राहणार या सोयी-सुविधा३ कोटींच्या खर्चातून या स्थानकावर आठ प्लॅटफार्म, मिटिंग हॉल, तीन विश्रामगृह, महिला व पुरुषांसाठी प्रसाधनगृह, दर्शनीय भागात बगीचा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कुंपन भिंत, दुकानांची व्यवस्था, पार्सल आॅफीस, स्वतंत्र पोलीस चौकी, वाहनतळ, आधुनिक फॉल सिलींग तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे; पण सध्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याने पर्यायी व्यवस्था गरजेचे आहे. 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ