शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य जागा बळकावून सुरू होते म्हस्केचे सेतू केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 23:42 IST

कारंजा तालुक्याच्या धर्ती या गावासाठी चार वर्षांपूर्वी सेतू केंद्र रुपेश म्हस्के याला शासनाने मंजूर केले होते. हे सुविधा केंद्र ग्रामीण भागात न चालविता रुपेश म्हस्के तालुका मुख्यालयी शहरी भागात नियमबाह्यपणे चालवित होता.

ठळक मुद्देरुपेश म्हस्केचा प्रताप : पत्रकार असल्याची करीत होता बतावणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कारंजा तालुक्याच्या धर्ती या गावासाठी चार वर्षांपूर्वी सेतू केंद्र रुपेश म्हस्के याला शासनाने मंजूर केले होते. हे सुविधा केंद्र ग्रामीण भागात न चालविता रुपेश म्हस्के तालुका मुख्यालयी शहरी भागात नियमबाह्यपणे चालवित होता. एवढेच नव्हे तर त्याने नगर पंचायतीच्या जागेवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून ही जागाही बळकावली होती.पत्रकार असल्याची बतावणी करून तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांना धमकाविण्याचा त्याचा गोरखधंदा असल्याची माहिती तलाठी मारहाणीच्या घटनेनंतर लोकमतला मिळाली आहे. अनेक अधिकाºयांनी याबाबतचे पुरावे लोकमतकडे सुपूर्द केले आहेत. म्हस्के हा सद्गुरु झेरॉक्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर जॉब वर्क या नावाने कारंजा येथील मुख्य मार्गावर सेतू केंद्र चालवित होता. अतिक्रमणीत जागा बळकाविण्यासाठी त्याने या जागेचा अनधिकृत आठ-अ व उतारा सुद्धा जमविला होता. येथे ग्रा.पं. असताना हे काम करण्यात आले होते. या अतिक्रमणीत जागेवर विद्युत जोडणीही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कसे दिले. हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.या ठिकाणी नियमबाह्यपणे सेतू केंद्र चालवून जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र तयार केले जात होते. ५५ रुपयांत तयार होणारे या प्रमाणपत्राचे कागदपत्र तयार करण्यासाठी २०० रुपये आकारले जात होते. तसेच सालवंसी प्रमाणपत्रासाठी सुद्धा ५०० रुपये घेतले जात होते. याबाबतच्या रसीदा लोकमतच्या हाती लागल्या आहे. मात्र, अलीकडेच कारंजा नगरपंचायतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबवून म्हस्के यांचे अवैध सेतू केद्र जमिनदोस्त केले. ही जागा मोकळी केली आहे; पण त्यानंतरही हे सेतू केंद्र धर्ती येथे न नेता आपल्या घरातून म्हस्के चालवित असल्याची माहिती तलाठी संघटनेने आता जमा केली आहे. याबाबत तत्काळ कारवाई महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी तलाठी संघटनेची आहे.आरोपीची रवानगी वर्धा येथील कारागृहातकारंजा पोलिसानी रुपेश म्हस्के याला तलाठी मारहाणीच्या प्रकरणात अटक केल्यानंतर शुक्रवारी आर्वी न्यालयात त्याला हजर करण्यात आले. तेथे त्याचा जामीन नाकारण्यात आला. शिवाय त्याला ३० आॅगस्टपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर लगेच कारंजा पोलिसानी त्याची वर्धा येथील कारागृहात रवानगी केली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा