शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

म्हसाळा ग्रामपंचायतीवर भाजपला एकहाती सत्ता

By admin | Updated: November 4, 2015 02:26 IST

जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात कारंजा तालुक्यातील

वर्धा : जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात कारंजा तालुक्यातील सेलगाव (उमाटे) व वर्धा तालुक्यातील म्हसाळा येथे भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले. तर वर्धेलगतच्या वरूडसह समुद्रपूर तालुक्यातील पिपरी व साखरा ग्रा.पं.त संमिश्र स्थिती असल्याने सदस्याची रस्सीखेच होणार आहे. म्हसाळा ग्रामपंचायतवर भाजपाने एकहाती सत्ता प्राप्त केली. आ. डॉ. पंकज भोयर यांच्या नेतृत्वात लढलेल्या निवडणुकीत १७ पैकी १० जागा जिंकल्या. भाजपप्रणित परिवर्तन पॅनल रिंगणात होते. यात सुरेखा नंदू सरोदे, कल्पना प्रकाश मानकर, राजू नारायणसिंग धमाने, अनिता दिलीप टिपले, पद्माकर हरिभाऊ नगराळे, राजू उर्फ राजेंद्र छत्रपती टिपले, ज्योत्सना दीपक गवई, सुधीर उर्फ सागर सुरेश मरघडे, चंद्रकला गुलाबराव खंडाते व चंदा नरेंशचंद्र वाळके विजयी झाल्या. राष्ट्रवादी गटाकडून अनिल उमाटे, संदीप पाटील, राजू पारपल्लीवार, धिरज वर्मा, रेखा झाडे, सुरेखा पाणतावने विजयी झाल्या. एक जागा अपक्षाला मिळाली असून रेखा चव्हाण निवडून आल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)साखरा येथे शेंडे गट, तर व पिपरीत सोनवणे आघाडी वरचढ ४गिरड - समुद्रपूर तालुक्यातील साखरा व पिपरी (सोनवणे) ग्रा.पं.चा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये साखरा ग्रां.पं.त गजानन शेंडे गटाचे ६ उमेदवार निवडून आले. तर धवने गटाला ३ जागेवर समाधान मानावे लागले. पिपरी ग्रा.पं.त सोनवणे गटाने ६ जागा पटकाविल्या. विरोधातील अरूण झाडे गटाला केवळ १ जागा मिळाली. तालुक्यातील १२ ग्रा.पं. मधील १४ जागांकरिता झालेल्या पोटनिवडणुकीत पाच ग्रा.पं.अविरोध तर सात ग्रा.पं. आठ जागा रिक्त आहे. ४साखरा ग्रामपंचायतीत गजानन शेंडे गटाचे अंकुश बुजाडे, शुभांगी कठाणे, मिना राऊत, महेंद्र भगत, संध्या चौधरी, शीला धारणे हे उमेदवार निवडून आले. धवने गटाचे गजानन ढोले, पवन बैस, सोनाली गोवारकर हे विजयी झाले. पिपरी ग्रा.पं. मध्ये सोनवणे पाटील गटातील पुष्पा राऊत, प्रकाश म्हैसकर, सरला कुंभरे, भारत राऊत, अर्चना भगत, निता हिवरकर तर अरूण झाडे गटाचे अमर झाडे विजयी झाले. पोटनिवडणुकीत फरीदपूर येथे कल्पना डांगे, लसनपूर येथे सविता आत्रात, झुनका येथेक कुसूम नारनवरे, प्रतिभा लुंगे, तास येथे चंद्रकला गोटे, पारडी येथे माधुरी वेले हे अविरोध विजयी झाले.(वार्ताहर) सेलगाव (उमाटे) ग्रा.पं. भाजपाच्या ताब्यात४कारंजा (घा.) (ता.प्र.)- कारंजा तालुक्यातील सेलगाव (उमाटे) ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात गेली आहे. येथील पैकी ६ जागांवर भाजपने ताबा मिळविता तर काँग्रेसला तीन जागेवर समाधान मानावे लागले. ४यात भाजपाच्यावतीने लिलाधर चौधरी (२३१), गीता सुरेश किनकर (२४५), तारा सुधाकर ढोले (२६५), सतीश नानाजी घागरे (२०६), देवकाबाई चोपडे (१८०), सुर्यकांता घागरे (१८७) तर काँग्रेसच्या अनुसया रवकाळे (२०१), मालती मडावी (२३१), पुष्पा उत्तम काळे (२१४) या विजयी झाल्या. ४सिंदीविहिरी येथील पोटनिवडणुकीत चंदा शांताराम मुन्ने यांची अविरोध निवड झाली. सिंदीविहिरीमध्ये काँग्रेस गटाचे प्राबल्य वाढले असून विद्यमान भाजपाचे सरपंच वसंत मुन्ने अल्पमतात आले आहेत. सद्यपरिस्थित नवीन निवडून आलेल्या उमेदवारामुळे ९ पैकी काँग्रेस गटाजवळ ६ आणि भाजपा गटाजवळ ३ उमेदवार आहेत. (तालुका प्रतिनिधी)वरूड ग्रामपंचायत आघडींची गर्दी ४सेवाग्राम - वरूड ग्रामपंचायतीत आघाडींची गर्दी असल्याचे दिसून आले. यात विविध आघाड्या तयार झाल्याने एकछत्री सत्ता कोणालाही मिळाली नाही. यात प्रभाग क्रमांक १ मध्ये वरूड विकास आघाडीचे वासुदेव देवढे, वैशाली शिंदे, दीपक शिंदे यांनी बाजी मारली. प्रभाग क्रमांक २ मध्ये ग्रामाविकास आघाडीच्या रंजाना दाभुले, ग्रामीण लोकसेवा आघाडीचे सुनील फरताडे व सुलोचना कुमरे विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक ३ मध्ये वरूड विकास समितीच्या मुक्ता खंडारे व चंद्रककांत खोडके तर वरूड विकास आघाडीच्या स्मृतिका मून यांनी विजय मिळवला. प्रभाग क्रमांक ४ मध्ये वरूड विकास आघाडीच्या सुकेशनी धनविज ज्योती लोहांडे तर संघर्ष ग्रामविकास आघाडीचे अनिल कुकडे विजयी झाले. प्रभाग क्रमांक ५ मध्ये ग्रामविकास आघाडीचे बाबाराव बैले, अरुण फुलझेले विजयी झाले. तर संघर्ष ग्रामविकास आघाडीच्या रत्नकला मताले विजयी झाल्या. ४जि.प. सदस्य सुनीता ढवळे यांना धक्का यांना धक्का बसला असून संघर्ष ग्रामविकास आघाडीला केवळ दोन जागा मिळाल्या. ४मुक्ता खंडारे व शिला नेहारे यांना प्रत्येकी २१४ मते मिळाले. यामुळे येथे इश्वर चिठ्ठीने निकाल काढण्यात आला. यात खंडारे विजयी झाल्या. कुकडे-साहु यांच्या वरूड विकास आघाडीला तीन जागा मिळाल्या. राष्ट्रवादीचे अंबुलकर यांच्या उत्क्रांती पॅनलला एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही.(वार्ताहर)