शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी रॅलीतून ‘हेल्मेट’ वापराचा दिला संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:42 IST

मागील काही महिन्यांपासून हेल्मेट वापराबाबतची वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेची विशेष मोहीम थंडबस्त्यात पडली होती. सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर गरजेचा असून १८ नोव्हेंबरला त्याबाबत लोकमतने ‘हेल्मेट वापर मोहीम गारठली’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले.

ठळक मुद्देनव्या जोमाने नवी मोहीम सुरू : शहरातील प्रमुख मार्गाने केले मार्गक्रमण, लोकमतच्या वृत्ताची घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील काही महिन्यांपासून हेल्मेट वापराबाबतची वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेची विशेष मोहीम थंडबस्त्यात पडली होती. सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर गरजेचा असून १८ नोव्हेंबरला त्याबाबत लोकमतने ‘हेल्मेट वापर मोहीम गारठली’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेवून पोलीस प्रशासनाने सदर मोहीम पुन्हा नव्या जोमाने राबविण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी पोलीस अधीक्षक कार्यालय येथून जनजागृतीपर दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून हेल्मेट वापराचा संदेश देण्यात आला.हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीची सुरूवात पोलीस अधीक्षक कार्यालय येथून झाली. या रॅलीने बजाज चौक, शास्त्री चौक, बॅचलर रोड, आरती चौक, धुनिवाले मठ चौक, आर्वी नाका, शिवाजी चौक, बजाज चौक, बस स्थानक असे मार्गक्रमण केले. रॅलीचा समारोप पोलीस मुख्यालयात झाला. या जनजागृतीपर दुचाकी रॅलीत वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, आॅरेंज सिटी रायडर क्लब नागपूरचे पदाधिकारी तसेच सदस्य, एनसीसीचे छात्र सैनिक, दक्ष फाऊंडेशन पोलीस मित्र, डोमिनोझ, पीएनजी आणि सन्स ज्वेलर्स, न्य आर्टस् अ‍ॅन्ड कॉमर्स व सायन्स महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाला रा.पो.नि. शालिक उईके, वाचक शाखेचे स.पो. नि. दहिभाते, कल्याण शाखेचे स. पो. नि. मोहंडुळे, वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे स. पो. नि. जितेंद्र चहांदे, स. पो. नि. कोडापे, पो.उ.नि.पवार, गुजरकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Policeपोलिस