शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवर संदेश येऊनही तुरी घरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:02 IST

नाफेडची शासकीय तूर खरेदी बंद करण्यात आली. यात कागदपत्रे देऊनही बहुतांश शेतकरी आॅनलाईन नोंदीपासून वंचित राहिले. त्यांचा उद्रेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या नाफेड तूर खरेदी केंद्रावर दिसून आला; पण काही शेतकऱ्यांना तर मोबाईलवर संदेश येऊनही नाफेडला तूर विकता आली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव : नाफेडची शासकीय तूर खरेदी बंद करण्यात आली. यात कागदपत्रे देऊनही बहुतांश शेतकरी आॅनलाईन नोंदीपासून वंचित राहिले. त्यांचा उद्रेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या नाफेड तूर खरेदी केंद्रावर दिसून आला; पण काही शेतकऱ्यांना तर मोबाईलवर संदेश येऊनही नाफेडला तूर विकता आली नाही. आता त्यांनी कुणाकडे तूर द्यावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.यादीत नावे असलेल्या, तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी झालेल्या शेतकºयांची तूर नाफेडने खरेदी केली; पण कोळोणा (घोडेगाव) येथील तिखे नामक शेतकºयाने दोन महिन्यांपूर्वी पेरापत्रक, आधार कार्ड, बँक पासबुक नोंदणीसाठी दिले. दोन्ही भावंडांची तूर खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणी झाली. तत्सम संदेशही त्यांच्या मोबाईलवर प्राप्त झाले; पण जेव्हा ते शेतकरी तूर विक्रीसाठी नाफेडच्या पुलगाव केंद्रावर गेले तेव्हा तूर घेण्यास नकार देण्यात आला. त्यावेळी त्यांनी संबंधित कर्मचाºयाला विचारणा केली असता यादीत नाव नसल्याने तूर घेता येत नसल्याचे सांगण्यात आले. यांनी मोबाईलमधील नोंदणी क्रमांक व संदेश दाखविला; पण त्याला कर्मचाºयांनी प्रतिसाद दिला नाही. परिणामी, शेतकºयाला तूर घरीच ठेवावी लागली. आधुनिक तंत्रज्ञान युगात आधुनिकीकरणाचा फटकाच या शेतकºयांना बसल्याचे दिसून येत आहे. मोबाईलवर संदेश आहे; पण यादीत नाव नसल्याने या शेतकºयांना तूर खरेदीपासून वंचित राहावे लागले.खरेदी बंदमुळे शेतकरी चिंतिततुरीच्या भावामुळे शेतकरी अडचणीत आले आहे. नाफेडच्या तूर खरेदीच्या दरात व बाजारपेठेतील दरात मोठी तफावत आहे. पैसे नंतर मिळतील; पण भाव चांगला मिळेल, या आशेत शेतकरी तूर विक्रीसाठी नाफेड केंद्रावर आणत होते; पण नाफेडची खरेदी बंद झाल्याने आता पूढे काय, हा प्रश्न अनेक शेतकºयांना भेडसावत आहे.२६ एप्रिल रोजी डाटा मिसींगबाबत सर्व केंद्रांना सूचना दिल्या होत्या. तसेच मिसींग डाटा रिकव्हर करुन देवू, असे सांगितले होते; पण केंद्रांनी डाटा पाठविला नाही.- रिंगण चांदेकर, प्रतिनिधी, नाफेड.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड