शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवेसाठी मेघे समूह व अदानी फाउंडेशनचा करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 15:00 IST

Wardha : शैक्षणिक नवोपक्रम, वैद्यकीय संशोधन व जनआरोग्यासाठी संयुक्त वाटचाल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था आणि अहमदाबादस्थित अदानी फाउंडेशन यांच्यात देशांतर्गत जागतिक दर्जाची आरोग्यसेवा, शिक्षण व पायाभूत सुविधा अधिक कार्यक्षमतेने विकसित करण्यासाठी सामंजस्य झाले आहे याबाबतची संयुक्त घोषणा दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे विश्वस्त व अभिमत विद्यापीठाचे प्रधान सल्लागार सागर मेघे आणि अदानी समूहाचे संचालक डॉ. मलय महादेविया यांनी गुरुवारी केली. 

संयुक्त बैठकीला कुलपती दत्ता मेघे, प्र-कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, मेघे समूहाचे संचालक राघव समीर मेघे, कुलगुरू डॉ. ललित वाघमारे, मेघे व अदानी समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते. करारानुसार दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेच्या ध्येयधोरणांना कायम ठेवत दर्जेदार, नावीन्यपूर्ण आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाचा समावेश असलेले जागतिक दर्जाचे केंद्र विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रगत शिक्षण, संशोधन आणि सर्वसामान्यांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी हा सामाजिक करार असल्याचे सांगण्यात आले.

कुलपती दत्ता मेघे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रगत वाटचाल पुढेही सुरू राहील, असे डॉ. मलय महादेविया यांनी सांगितले. मेघे शिक्षण व आरोग्य समूहातील सर्व कर्मचारी माझ्या परिवाराचे सदस्य असून मी कायम त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास सागर मेघे यांनी दिला.

मेघे संस्था ३५ वर्षांहून अधिक काळापासून कार्यरत

  • ३५ वर्षांहून अधिक काळ आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात कार्य करणारी आमची संस्था अदानी फाउंडेशनसोबत कार्यरत होत आहे, हे प्रादेशिक आणि राष्ट्रीय विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे कुलपती दत्ता मेघे यांनी सांगितले.
  • बैठकीत ऑनलाइन सहभागी होत अदानी फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. प्रीती अदानी यांनीही मेघे संस्थेसोबत सहकार्याच्या भावनेतून एकत्रित कार्य करताना दर्जेदार आरोग्यसेवा आणि शिक्षण हा एक मूलभूत अधिकार आम्ही मानतो, असे स्पष्ट केले.
टॅग्स :wardha-acवर्धा