वर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध समितीची बैठक बुधवारी घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी दीपक नलवडे होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.जी. चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी अजय डवले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन निमोदिया, डॉ. मानकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवा देवागडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनीषा कुरसंगे आदींसह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी एप्रिल २०१५ ते आॅगस्ट २०१५ या कालावधीतील संपूर्ण आढावा सादर केला. एप्रिल ते आॅगस्ट या कालावधीत एकूण ११ हजार ४८८ सर्वसाधारण व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १२७ रूग्ण एचआयव्हीसह जीवन जगत आहेत. त्यात ७४ पुरूष व ५३ महिला आहेत. यामध्ये वर्धा तालुक्यात २८, हिंगणघाट १०, आर्वी ६, देवळी ६, कारंजा १०, समुद्रपूर ३, आष्टी ३, सेलू ७ व जिल्हाबाहेरील एकूण ५० असे एकूण १२७ रूग्ण आढळले आहेत. एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तिंना क्षयरोब होण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण ३४६ नोेंदणी झालेल्या टीबी रूग्णांची एचआयव्हीची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एकूण दहा रूग्णांना एचआयव्ही असल्याचे निदर्शनास आले. बाधित रूग्णांना शासनाच्या संजय गांधी निराधार, बाल संगोपन, अंत्योदय, श्रावणबाळ योजना, केशरी शिधापत्रिका धारक, दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकाधारक विमा, आरोग्य विमा रूग्णांची आवश्यक असेल तर एक्सरे, सोनोग्राफी व इतर तपासणी करण्याचे निर्देश नलावडे यांनी दिले.(शहर प्रतिनिधी)
जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध समितीची बैठक
By admin | Updated: October 1, 2015 02:58 IST